आर्णी येथे फुटवेअर दुकानाला आग
By Admin | Updated: May 17, 2014 23:52 IST2014-05-17T23:52:29+5:302014-05-17T23:52:29+5:30
येथील माहूर चौकातील एका फुटवेअर दुकानाला शनिवारी सकाळी आग लागली. या आगीत संपूर्ण तीनपत्र्याचे दुकान जळून भस्मसात झाला.

आर्णी येथे फुटवेअर दुकानाला आग
आर्णी : येथील माहूर चौकातील एका फुटवेअर दुकानाला शनिवारी सकाळी आग लागली. या आगीत संपूर्ण तीनपत्र्याचे दुकान जळून भस्मसात झाला. यात ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यातील सावळी येथील संतोष जयस्वाल यांच्या मालकीचा टीनपत्र्याचा ठेला आहे. त्यात एक फुटवेअरचे दुकान आहे. शनिवारी पहाटे ६.३० वाजता अचानक आग लागली. आग लागल्याचे माहीत होताच बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. आग विझविण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. यवतमाळवरून अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण दुकान भस्मसात केले. यात चपला, जोडे व इतर साहित्य जळाले असून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. (तालुका प्रतिनिधी)