शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पुसद येथे अग्निशस्त्र विकणाऱ्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

इम्तियाजला काही वर्षापूर्वी दराटी पोलिसांनी काडतुसासह अटक केली होती. यावेळी त्याचा अवैध शस्त्रविक्रीचा भंडाफोड झाला होता. त्यानंतरही इम्तियाजविरोधात वसंतनगर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी ३०७ चा गुन्हाही त्याच्यावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून इम्तियाजचा खून हा त्याच्या अवैध शस्त्रविक्रीच्या व्यवसायातूनच झाल्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देहाॅटेलसमोर थरार : अवैध शस्त्र विक्री व्यवहारातून वादाचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरासह परिसरात चोरट्या मार्गाने अग्निशस्त्रांची विक्री करणाऱ्या युवकाची गोळ्या झाडून रविवारी दुपारी हत्या करण्यात आली. या थरारक घटनेने पुसद शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हे हत्याकांड शस्त्र विक्री व्यवहारातील वादातून झाले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. इम्तियाज खान सरदार खान (२८, रा. वसंतनगर, पुसद) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ओंकार पवार (१९, रा. हिवरी, ता. महागाव) याला ताब्यात घेतले आहे. वाशिम रोडवरील एका हाॅटेलजवळ त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी गोळीबार केला. इम्तियाजवर सहा राऊंड फायर केले. त्यापैकी एक गोळी त्याच्या डोक्यात व दोन गोळ्या छातीवर लागल्याने जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ओंकार पवार याने सै. अस्लम सै. सलीम (२०, रा. काळी दौ, ता. महागाव) हा देखिल मारेकरी असल्याचे सांगितले. आरोपी ओंकार हा चालक असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुसद शहर पोलिसांनी आरोपी ओंकार याला हिवरी येथून अटक केली. ही कामगिरी पुसद शहर एपीआय रत्नपारखी, ढोमणे, एएसआय ससाने, भाऊ ताठे, मोहम्मद जलील यांनी केली. या घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन, शहर ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी भेट दिली. इम्तियाज हा कारमधील एसी दुरुस्तीचे काम करीत होता. तो विवाहित असून त्याला पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा आप्त परिवार आहे. 

काडतुसासह केली होती अटक - इम्तियाजला काही वर्षापूर्वी दराटी पोलिसांनी काडतुसासह अटक केली होती. यावेळी त्याचा अवैध शस्त्रविक्रीचा भंडाफोड झाला होता. त्यानंतरही इम्तियाजविरोधात वसंतनगर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी ३०७ चा गुन्हाही त्याच्यावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून इम्तियाजचा खून हा त्याच्या अवैध शस्त्रविक्रीच्या व्यवसायातूनच झाल्याची शक्यता आहे.

कारागृहातून सुपारी दिल्याचा संशय  - गोळीबार हत्याकांडातील मुख्य सूत्रधार हा मोक्काअंतर्गत कारागृहात आहे. तेथूनच सुपारी देवून इम्तियाजचा गेम झाला असावा असा संशय वर्तविला जात आहे. शस्त्रविक्रीतील व्यवहारातून दोन गट पडले. यातून हा वाद पेटला. यातूनच ही हत्या घडवून आणल्याचे सांगितले जाते.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस