धानोरा येथे आगीत दुकान व घराची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:37 AM2021-04-05T04:37:22+5:302021-04-05T04:37:22+5:30

धानोरा येथे अचानक एक किराणा दुकान व घराला आग लागली. यात दोन लाख ५० हजारांचे नुकसान झाले. संतोष रामा ...

Fire shop and house ashes at Dhanora | धानोरा येथे आगीत दुकान व घराची राखरांगोळी

धानोरा येथे आगीत दुकान व घराची राखरांगोळी

Next

धानोरा येथे अचानक एक किराणा दुकान व घराला आग लागली. यात दोन लाख ५० हजारांचे नुकसान झाले. संतोष रामा काळे यांच्या दुकानाला व घराला आग लागली. त्यांचे घर आणि दुकान शेजारी आहे. पहाटे ४ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत त्यांच्या दुकानातील कपडे, किराणा साहित्य, फ्रिज, लाकूड व संपूर्ण घरातील सामान खाक झाले. दुकानातील रोख २८ हजार रुपये आगीत खाक झाल्याने संपूर्ण काळे कुटुंबीय उघड्यावर आले आहे.

आग लागताच संतोष काळे यांनी कुटुंबीयांना घराबाहेर काढून आरडाओरडा केली. त्यामुळे घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेत त्यांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पाेलिसांनी घटनेची नोंद घेतली असून जमादार संतोष चव्हाण तपास करीत आहेत.

Web Title: Fire shop and house ashes at Dhanora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.