वैद्यनगरातील मॅटर्निटी हॉस्पिटलला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 22:00 IST2017-10-04T22:00:08+5:302017-10-04T22:00:24+5:30

येथील आर्णी मार्गावरील एसटी कार्यशाळेमागील वैद्यनगर स्थित मॅटर्निटी हॉस्पिटलला बुधवारी दुपारच्या सुमारास शॉटसर्किटने अचानक आग लागली.

Fire to Matanity Hospital in Vaidyanagar | वैद्यनगरातील मॅटर्निटी हॉस्पिटलला आग

वैद्यनगरातील मॅटर्निटी हॉस्पिटलला आग

ठळक मुद्देअनर्थ टळला : हजारोंचे साहित्य भस्मसात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील आर्णी मार्गावरील एसटी कार्यशाळेमागील वैद्यनगर स्थित मॅटर्निटी हॉस्पिटलला बुधवारी दुपारच्या सुमारास शॉटसर्किटने अचानक आग लागली. सुदैवाने आग वेळीच नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला.
येथील डॉ. बेलसरे यांच्या हॉस्पिटलमधील जनरेटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. आगीने जवळच असलेल्या कुलर व इतर साहित्यांना आपल्या कवेत घेतले. तत्काळ ही माहिती अग्नीशमन दलाला देण्यात आली. तसेच बाळंतपणासाठी आलेल्या सर्व महिलांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अग्नीशमन दलाने तत्काळ पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे आग लागली तेव्हा एका गर्भवती महिलेचे आॅपरेशन थिएटरमध्ये सिजेरियन सुरू असल्याची माहिती आहे.

Web Title: Fire to Matanity Hospital in Vaidyanagar