शेंबाळपिंपरी येथे आगीत चार दुकाने भस्मसात

By Admin | Updated: June 2, 2014 01:47 IST2014-06-02T01:47:36+5:302014-06-02T01:47:36+5:30

पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील बसस्थानक परिसरातील चार ..

Fire at four shops in Shyambal Pimpri | शेंबाळपिंपरी येथे आगीत चार दुकाने भस्मसात

शेंबाळपिंपरी येथे आगीत चार दुकाने भस्मसात

शेंबाळपिंपरी : पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील बसस्थानक परिसरातील चार दुकानांना शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत चारही दुकाने जळून भस्मसात झाली असून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले.

इम्रान पठाण यांचे जेके ऑटोमोबाईल असून या ऑटोमोबाईलला लागलेल्या आगीत सुमारे ८0 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्याच शेजारी असलेल्या सादिक शेख यांचे एस.के. ऑटोमोबाईलही आगीच्या भक्षस्थानी सापडले. यात सुमारे दीड लाख रुपयांचे साहित्य भस्मसात झाले. रोहिदास सुरोशे यांच्या तुळजाभवानी पानसेंटरला आग लागून सुमारे १५ हजार रुपयांचे तर केशव सूर्यवंशी यांचे महाराष्ट्र टी हाऊस आगीत भस्मसात झाले. त्यांचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या आगीत मोटारसायकल, फ्रीज, ऑटोमोबाईल दुकानातील स्पेअर पार्ट जळाले. आग लागल्याचे माहीत होताच गावकर्‍यांनी धाव घेतली.

आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. या आगीमुळे चार व्यावसायिक उघड्यावर आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Fire at four shops in Shyambal Pimpri