यवतमाळ लाकडी मिलला आग; मध्यरात्री दोन वाजता आगीचे भीष्ण तांडव, लाखोंचे नुकसान

By सुरेंद्र राऊत | Updated: March 11, 2024 09:40 IST2024-03-11T09:34:32+5:302024-03-11T09:40:50+5:30

ही घटना रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाची पथक वेळीच आल्याने आग आटोक्यातआली. त्यामुळे इतर दुकानें आणि घरे वाचली.

Fire at Yavatmal Wood Mill; At 2 o'clock in the middle of the night, the fire broke out, causing damage to lakhs | यवतमाळ लाकडी मिलला आग; मध्यरात्री दोन वाजता आगीचे भीष्ण तांडव, लाखोंचे नुकसान

यवतमाळ लाकडी मिलला आग; मध्यरात्री दोन वाजता आगीचे भीष्ण तांडव, लाखोंचे नुकसान

यवतमाळ :यवतमाळच्या अप्सरा टाॅकीज परिसरातील लकडगंज मार्केट रोड वरील सय्यद टाल मीलला (टिम्बर मार्ट )आग लागुन लाखोचे साहित्य जळून खाक झाले आहे. उन्हाळ्यामुळे लाकडे ही वाळली असल्याने आग लवकर पसरली. यां भागात लाकडाचा मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो.

ही घटना रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाची पथक वेळीच आल्याने आग आटोक्यातआली. त्यामुळे इतर दुकानें आणि घरे वाचली.या घटनेत जिवितहानी टळली.पण यां घटनेत दोन दुचाकी वाहने जळून खाक झाली आहेत. ही नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.

Web Title: Fire at Yavatmal Wood Mill; At 2 o'clock in the middle of the night, the fire broke out, causing damage to lakhs