प्रशिक्षणार्थी पोलिसांना डोक्यावर पेटी घेऊन मैदानाला फेरीची शिक्षा
By Admin | Updated: December 15, 2014 23:08 IST2014-12-15T23:08:55+5:302014-12-15T23:08:55+5:30
प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यास विलंब केल्याच्या क्षुल्लक कारणावरून पाच पोलीस शिपायांना डोक्यावर पेटी देऊन मैदानाच्या फेऱ्या मारण्याची शिक्षा दिली गेली. येथील पोलीस मुख्यालयाच्या

प्रशिक्षणार्थी पोलिसांना डोक्यावर पेटी घेऊन मैदानाला फेरीची शिक्षा
यवतमाळ : प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यास विलंब केल्याच्या क्षुल्लक कारणावरून पाच पोलीस शिपायांना डोक्यावर पेटी देऊन मैदानाच्या फेऱ्या मारण्याची शिक्षा दिली गेली. येथील पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर १२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलीस शिपाई पदावर निवड झालेल्या उमेदवारांना पोलीस मुख्यालयात शारीरिक व अन्य प्रशिक्षण दिले जाते. पाच प्रशिक्षणार्थी पोलीस मुख्यालयातील परेड व ट्रेनिंगला विलंबाने आले एवढ्या क्षुल्लक कारणावरून त्यांना शिक्षा म्हणून सुरुवातीला डोक्यावर पेटी घेऊन मैदानाचे राऊंड मारण्यास सांगण्यात आले. त्यानंतर या शिपायांना काठीने मारहाण करण्यात आली. याच घटनेची पुनरावृत्ती सोमवारीही झाली. यावेळी डोक्यावर लाकडी ओंडके देण्यात आले होते. पोलीस मुख्यालयात जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्याने आपला ‘मान’ राखला नाही, एका शिटीत गिणतीला हजर झाले नाही म्हणून हे कृत्य केल्याचे सांगितले जाते. या घटनेची पोलीस दलात चर्चा असली तरी भविष्यात त्रास होईल व नोकरीही जाईल या भीतीने या पाचही प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायांनी सध्या तरी वरिष्ठांकडे तक्रार देणे टाळले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)