अखेर वसंत सहकारी साखर कारखाना अवसायनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:48 IST2021-08-13T04:48:27+5:302021-08-13T04:48:27+5:30
२०१५-१६ मध्ये आर्थिक परिस्थितीअभावी कारखाना बंद पडला होता. हंगाम २०१८-१९ मध्ये कारखाना पूर्णतः बंद पडला. प्रादेशिक सहसंचालक अमरावती ...

अखेर वसंत सहकारी साखर कारखाना अवसायनात
२०१५-१६ मध्ये आर्थिक परिस्थितीअभावी कारखाना बंद पडला होता. हंगाम २०१८-१९ मध्ये कारखाना पूर्णतः बंद पडला. प्रादेशिक सहसंचालक अमरावती (साखर) यांनी सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १० २(१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून कारखाना अवसायनात काढला. कारखान्यावर वाय.पी. गोतरकर, लेखापरीक्षक श्रेणी-१ यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वसंत सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी पाठपुरावा केला. कारखाना सुरू करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीही पाठपुरावा केला होता. परंतु कारखान्यावरील आर्थिक बोजा वाढल्यामुळे हा कारखाना सुरू झाला नाही. दरम्यान, प्रशासक सुरेश महंत त्यांनी वेळोवेळी टेंडर बोलावून कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न केला. परंतु दोनदा टेंडर काढूनही कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात आला नाही. अखेरीस कारखाना अवसायनात काढण्यात आला. कारखाना अवसायनात काढल्यामुळे कारखान्यावरील व्याज व्याज कमी होणार आहे.