शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ ४२ शाळा वाचल्या! २५ एप्रिलचा प्रस्ताव स्थगित करण्याची शासनाला विनंती, संचालकांचे घूमजाव

By अविनाश साबापुरे | Updated: June 9, 2024 08:01 IST

Yavatmal News: राज्यातील मुलींच्या ४२ शाळा बंद करून तेथे केवळ वसतिगृहे सुरू ठेवावे, असा अजब प्रस्ताव महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शासनाला दिला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने ३ जूनच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने तत्काळ दखल घेतली.

- अविनाश साबापुरेयवतमाळ - राज्यातील मुलींच्या ४२ शाळा बंद करून तेथे केवळ वसतिगृहे सुरू ठेवावे, असा अजब प्रस्ताव महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शासनाला दिला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने ३ जूनच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. परिषदेच्या संचालकांनी तातडीने घूमजाव करीत आपला प्रस्ताव स्थगित ठेवावा, अशी लेखी विनंती शासनाकडे केली. त्यामुळे सध्या तरी या शाळा सुरूच राहणार आहेत.

वंचित घटकातील मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून शासनाने महाराष्ट्रात २००८ पासून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये सुरू केली. मात्र, आता नव्या शिक्षण धोरणानुसार या शाळांमध्ये ‘सहशिक्षणा’च्या तत्त्वाचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत या शाळा बंद करण्याचा प्रस्ताव करण्याचा अहवाल प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक प्रदीप डांगे यांनी  पाठविला होता. 

२०२४-२५ या शैक्षणिक सत्रापासून ४२ शाळा बंद करून तेथे केवळ वसतिगृह सुरू ठेवण्याची विनंती त्यांनी केली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने ३ जूनच्या अंकात ‘मुलींच्या ४२ शाळा करा बंद, शिक्षण परिषदेचा अजब अहवाल’ अशा मथळ्याचे वृत्त दिले होते.त्यामुळे जनमानस संतप्त झाले. मावळा संघटनेने शिक्षण परिषदेकडे जाब विचारला. मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांनीही चिंता व्यक्त केली. याची दखल परिषदेने घेतली. 

पालकांना हे विद्यालय आपल्या मुलींच्या शिक्षणाचे माहेरघर वाटते. त्यामुळे ही विद्यालये बंद करण्याचा २५ एप्रिलचा प्रकल्प संचालकांचा प्रस्ताव रद्द करून याबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा व्हावी. संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेतले जावे. या विद्यालयांच्या दोन एकरांतील इमारतींवर कुणाचा तरी डोळा असावा असे वाटते.- राहुलदेव मनवर, उपाध्यक्ष, मावळा संघटना 

थांबलेली प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार?  - परिषदेच्या संचालकांनी ६ जूनला शिक्षण सचिवांना पत्र पाठवून आपला २५ एप्रिलचा प्रस्ताव स्थगित करण्याची विनंती केली.- तसेच उच्च न्यायालयाच्या १२ जुलै २०१७ रोजीच्या आदेशाचा संदर्भ देत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाबाबत सध्याच शासन स्तरावरून कोणताही निर्णय घेणे उचित होणार नाही, असेही संचालकांनी आपल्या पत्रात नमूद केले. - त्यामुळे ४२ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये पूर्वीप्रमाणेच अध्यापन व निवास अशा दोन्ही स्वरुपात सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच २०२४-२५ या सत्राची थांबलेली प्रवेश प्रक्रियाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणYavatmalयवतमाळ