तुरीसाठी अखेर ३० हजार पोते आले

By Admin | Updated: March 10, 2017 01:09 IST2017-03-10T01:09:11+5:302017-03-10T01:09:11+5:30

जिल्ह्यातील तूर खरेदीसाठी अखेर गुरूवारी ३० हजार पोते उपलब्ध झाले.

Finally, there were about 30 thousand grandchildren | तुरीसाठी अखेर ३० हजार पोते आले

तुरीसाठी अखेर ३० हजार पोते आले

११ केंद्र : १५ हजार क्विंटल तुरीची खरेदी शक्य
यवतमाळ : जिल्ह्यातील तूर खरेदीसाठी अखेर गुरूवारी ३० हजार पोते उपलब्ध झाले.
बारदाना नसल्याने जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी ठप्प पडली आहे. त्यामुळे बाजार समितींमध्ये समस्या निर्माण होत आहे. शेतकरी संतापले आहेत. यातूनच ुबुधवारी जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींनी बारदान्यासाठी चक्क घोंगडी आंदोलन केले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. प्रशासनाने त्वरित मागण्यांबाबत हालचाल सुरू केली. अखेर गुरूवारी अकोला आणि गडचिरोली येथून ३० हजार पोते जिल्ह्यात पोहोचले आहे. हे सर्व पोते जिल्ह्यातील विविध ११ तूर खरेदी केंद्रांकडे रवाना करण्यात आले. मात्र या पोत्यांमध्ये केवळ १५ हजार क्विंटलच तूर खरेदी करणे शक्य आहे. त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तूर खरेदी केंद्रांवर पडून आहे.
राजस्थानमधून दोन ट्रक बारदाना निघाल्याचे आत्तापर्यंत सांगण्यात येते होते. मात्र ही बाब खोटी असल्याचे स्पष्ट झाले. तेथून बारदान्याचा ट्रक निघालाच नाही. तथापि बुधवार, ८ मार्चला मात्र एका ट्रकमध्ये ३० हजार पोते बारदाना यवतमाळकडे रवाना झाला आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Finally, there were about 30 thousand grandchildren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.