अखेर आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती
By Admin | Updated: February 23, 2015 00:15 IST2015-02-23T00:15:48+5:302015-02-23T00:15:48+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने १२७ नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पदोन्नतीच्या मागणीसाठी ...

अखेर आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने १२७ नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पदोन्नतीच्या मागणीसाठी आरोग्य संघटना सातत्याने आंदोलन करत होत्या. यात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुढाकार घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न निकाली काढला आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रस्तावामध्ये अनेक त्रृट्या आढळल्या, त्यामुळे पदोन्नतीचे प्रस्ताव अडगळीत पडून होते. संघटनेने २ मार्चपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला होता. यामध्ये २४ वर्ष पदोन्नतीच्या ८८ महिला कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला आहे. १२ वर्ष पदोन्नतीतील २२ महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना, १७ आरोग्य सेवकांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. आरोग्य संघटनेच्या इतर प्रलंबित मागण्या अंतिम टप्प्यात असून, त्याला प्रशासनाकडून विलंब होत आहे. यासंदर्भात संघटनेची आणि जिल्हा परिषद प्रशासनाची बैठक होणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड़ राठोड यांनी याबाबत पुढाकार घेऊन प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.
यात प्रशासकीय अधिकारी सुधाकर मेश्राम, स्मीता ठाकरे, प्रदीप तिखे, वाघमारे यांनी सहकार्य केले. संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, एम.ए. कय्युम, शुभांगी गावंडे, प्रमोद इंगळे, अनंत सावळे, पी.एम. शेणमारे, गणेश आंबीलकर, धनंजय मेश्राम, जगदीश शुक्ला, छाया काळे, कल्पना शामसुखा, दिलीप गोल्हर, मोरेश्वर गडलिंग, राम भगत, नरेंद्र वासनिक यांनी पुढाकार घेतला. (कार्यालय प्रतिनिधी)