कर्तव्याशी प्रामाणिक राहून हक्कांसाठी लढा
By Admin | Updated: July 22, 2015 00:22 IST2015-07-22T00:22:23+5:302015-07-22T00:22:23+5:30
महिला कामगारांनी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहून आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा.

कर्तव्याशी प्रामाणिक राहून हक्कांसाठी लढा
यवतमाळ : महिला कामगारांनी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहून आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा. समर्थपणे कामगार संघटनांशी एकनिष्ठ राहून महिलाशक्ती दाखवून द्यावी. आपण सदैव संघटनेच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शिला नाईकवाडे यांनी दिली.
एसटी कामगार संघटना व इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनच्या वतीने महिला कामगार मेळावा जेसीआय भवनात उत्साहात पार पडला. त्यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार संघटनेचे विभागीय सचिव सदाशिव शिवणकर होते. प्रमुख अतिथी एसटी बँक संचालक प्रवीण बोनगीनवार उपस्थित होते.
विभागीय सचिव सदाशिव शिवणकर म्हणाले की, कामगारांच्या हक्कांसाठी लढा देऊ . महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव तत्पर राहू व अग्रक्रमाने तक्रारींची सोडवणूक करण्याची ग्वाही शिवणकर यांनी दिली. या मेळाव्यात उपस्थित महिलांनी तक्रारींचा पाढाच वाचला. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एसटी कामगार महिला मेळावा झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी प्रमोदिनी किनाके यांनीही विचार मांडले. अकोला येथील सविता नागवंशी, शबनम खान, प्रमिला गेडाम, उषा ताथोड, माया कंगाले, कल्पना निकोसे, सुवर्णा मारकडे, प्रिती पाटील, स्वाती भोयर, सत्यभामा गादेकर, सुरेखा मंडाले, कोमल भोयर, सुचिता शेंद्रे, रत्नमाला गायकवाड, लक्ष्मी निमसरकर, माधुरी राजगुरे, जया नागरिकर, गंगाबाई जयकुंडे, रुपाली अपराजित, विभा मासाळ, वनिता मैसाळे, रुखमा मानवटकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रादेशिक महिला संघटक रंजुषा किरणपुरे यांनी केले. तर राजश्री नेवारे यांनी आभार मानले.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी एसटी कामगार संघटना व इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी आणि सदस्यांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)