शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कोरोनात पाचव्या-आठव्या वर्गांची रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेने तीन वर्षांपूर्वी आपल्या ज्या शाळांमध्ये चौथीपर्यंत वर्ग आहे, तेथे पाचवा वर्ग सुरू केला. तर जेथे सातवीपर्यंत वर्ग आहे, तेथे आठवा वर्ग सुरू केला. मात्र या निर्णयामुळे संबंधित गावातील खासगी अनुदानित शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाल्याने अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या संघटनांनी विरोध सुरू केला. विभागीय आयुक्त स्तरापर्यंत हा प्रश्न नेण्यात आला होता. त्यातून शासनालाही सुधारित शासन निर्णय निर्गमित करावा लागला होता.

ठळक मुद्देशिक्षक संघटना आमनेसामने : स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एकीकडे कोरोनामुळे शाळा कशा सुरू कराव्या, हा प्रश्न जटिल बनलेला असताना पाचवा-आठवा वर्ग कोणी सुरू ठेवावा अन् कोणी बंद करावा, यावरून शिक्षक संघटनांचे वाक्युद्ध रंगले आहे. विद्यार्थी संख्या टिकविण्यासाठी जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळांचे शिक्षक आणि खासगी अनुदानित शाळांचे शिक्षक प्रशासनापुढे आमनेसामने उभे ठाकले आहेत.जिल्हा परिषदेने तीन वर्षांपूर्वी आपल्या ज्या शाळांमध्ये चौथीपर्यंत वर्ग आहे, तेथे पाचवा वर्ग सुरू केला. तर जेथे सातवीपर्यंत वर्ग आहे, तेथे आठवा वर्ग सुरू केला. मात्र या निर्णयामुळे संबंधित गावातील खासगी अनुदानित शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाल्याने अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या संघटनांनी विरोध सुरू केला. विभागीय आयुक्त स्तरापर्यंत हा प्रश्न नेण्यात आला होता. त्यातून शासनालाही सुधारित शासन निर्णय निर्गमित करावा लागला होता. या सर्व प्रक्रियेदरम्यान शिक्षक आघाडी, शिक्षक महासंघ, शिक्षण संघर्ष संघटना आदींनी अनुदानित शाळांची बाजू उचलून धरली. अखेर २७ फेब्रुवारीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळांमधील नियमाचे उल्लंघन होणारे वर्ग बंद करण्याबाबत आदेश काढले.परंतु, जिल्हा परिषदेच्या एकाही शाळेने नियम मोडलेला नाही. उलट नियमानुसारच, असे वर्ग आवश्यक असल्याचा दावा जिल्हा परिषद शिक्षक संघटनांच्या महासंघाने घेतली आहे. त्याऐवजी खासगी अनुदानित शाळांचेच पाचवी आणि आठवीचे वर्ग अनधिकृत असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. एकीकडे शाळा सुरू करण्याबाबत निश्चित निर्णय झालेला नसताना वर्गांबाबतची ही शिक्षकांची खेचाखेची पालकांना संभ्रमात टाकत आहे.आमदारकीच्या निवडणुकीसाठी राजकारणवाढलेल्या लॉकडाऊनमुळे जुलैमध्ये शाळाच सुरू होण्याची शक्यता नाही. आॅगस्टबाबत अजून निश्चित असा निर्णय झालेला नाही. त्यामुळे यंदा कोणाचे वर्ग बंद होतात अन् कोणाचे सुरू राहतात, याबाबतची स्पर्धा निष्फळ ठरण्याची शक्यता आहे. मात्र तोंडावर आलेल्या शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीसाठी खासगी अनुदानित शाळेच्या शिक्षकांना खूश करता यावे, यासाठी काही संघटना पाचव्या-आठव्या वर्गाचा मुद्दा तापवत असल्याचा आरोप जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य मधुकर काठोळे यांनी केला आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये सोयीच नाहीपाचवा व आठवा वर्ग सुरू करणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये त्यासाठी आवश्यक सुविधा नसल्याचा दावा, अनुदानित शाळेच्या शिक्षकांकडून करण्यात येत आहे. आठवीला शिकविण्यासाठी विषय शिक्षक नाही, प्रयोगशाळा नाही, असे सांगितले जात आहे. शिवाय, अंतराची अट पाळली न गेल्याचाही दावा केला जात आहे. परंतु, अंतराचा निकष अनुदानित शाळांनीच मोडीत काढल्याचा प्रतिदावा स्थानिक स्वराज्य संस्थांचे शिक्षक करीत आहेत.टीसी देऊ नका, न्यायालयात जाऊ!दरम्यान जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध संघटनांच्या महासंघाची बैठक गुरुवारी पार पडली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जबरीने अनुदानित शाळेत नेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी टीसी मागणाऱ्या पालकांचे प्रबोधन करावे, त्यांना टीसी देऊ नये, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तर अनुदानित शाळांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात जाण्याचाही निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा