माहूर येथे पाचवी धम्म परिषद

By Admin | Updated: March 19, 2015 02:06 IST2015-03-19T02:06:11+5:302015-03-19T02:06:11+5:30

येथील बौद्ध धम्म परिसरात २१ व २२ मार्च रोजी पाचवी धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.

Fifth Dhamma Parishad at Mahur | माहूर येथे पाचवी धम्म परिषद

माहूर येथे पाचवी धम्म परिषद

माहूर : येथील बौद्ध धम्म परिसरात २१ व २२ मार्च रोजी पाचवी धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. या निमित्त धम्मदेसना, धम्मसंवाद, विचारवेध सत्र, धम्म सांस्कृतिक संध्या, धम्म सांस्कृतिक कीर्तन, बुद्ध-भीमगीते, रक्तदान शिबिर, महिला धम्मसंवाद, धम्म कविसंमेलन, समूह नृत्य स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत.
२१ ला भदंत बी. अश्वजीत आणि नामदेवराव मनवर यांच्या मार्गदर्शनात धम्मफेरी, पंचशील ध्वजारोहण, बुद्ध वंदना आणि आप्पाराव मैंद यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. धम्मदेसना कार्यक्रम वटफळी, शिरसगाव पांढरी, हुडी आणि यवतमाळ येथील भन्ते यांच्या सहभागात होईल. धम्मसंवाद कार्यक्रमात डॉ.राजेंद्र गवई यांचा सत्कार केला जाणार आहे. या शिवाय विविध कार्यक्रम या दिवशी होतील.
२२ रोजी मुळावा, गांधीगुडा (आंध्र प्रदेश), यवतमाळ, अमरावती, पुसद, परभणी येथील भन्तेंची धम्मदेसना होईल. याच दिवशी रक्तदान शिबिर, संगीतप्रबोधन आदी कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी धम्म कविसंमेलन होणार आहे. ‘वादळ वारा’ हा कार्यक्रम अनिरुद्ध वनकर आणि संच चंद्रपूर हे सादर करतील. या परिषदेत सहभागी होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Fifth Dhamma Parishad at Mahur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.