शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

दुय्यम निबंधक कार्यालयाला दलालांचा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 5:00 AM

मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, दस्त नोंदणी कायदा १९०८ यामध्ये स्पष्ट निर्देश दिले आहे. येथील उपनिबंधकाकडून केवळ दस्त नोंदणी करून घेणे हीच एक जबाबदारी नाही, तर नोंदणीसाठी आलेला दस्त कायदेशीर आहे की नाही, याचीही पडताळणी करणे अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात दलाल सक्रिय बनले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा वकील संघाचा ठराव : घोटाळे टाळण्यासाठी कॉपी-पेस्ट थांबवा, कंत्राटी कर्मचारीही सामील

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करताना त्याची कायदेशीर पडताळणी केली जात नाही. केवळ खरेदी-विक्री व्यवहाराचे दस्त योग्यरित्या तपासले जातात. मात्र याव्यतिरिक्त बक्षीसपत्र, मालमत्ता घोषणापत्र, मृत्युपत्र यासह इतरही महत्त्वाच्या दस्तांची नोंदणी केली जाते. हे दस्त कायदेशीर प्रक्रियेतून तयार झाले का, याची फारशी पडताळणी होत नाही. उपनिबंधक कार्यालयात काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी व अनधिकृत दलालांनी ठिय्या मांडला आहे. ही बाब गंभीर असल्याचा आक्षेप जिल्हा वकील संघाच्या आमसभेत घेण्यात आला. वकील संघाने तसा ठराव पारित केला आहे. मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, दस्त नोंदणी कायदा १९०८ यामध्ये स्पष्ट निर्देश दिले आहे. येथील उपनिबंधकाकडून केवळ दस्त नोंदणी करून घेणे हीच एक जबाबदारी नाही, तर नोंदणीसाठी आलेला दस्त कायदेशीर आहे की नाही, याचीही पडताळणी करणे अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात दलाल सक्रिय बनले आहेत. ते थेट झेरॉक्स किंवा टायपिस्टकडे जाऊन कॉपी पेस्ट करीत नवीन दस्त तयार करतात. याच दस्तांवर व्यवहार केला जातो. विशेष म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयात दलाल व काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हस्तकांचीच चलती आहे. त्यामुळे बऱ्याचदा चुकीच्या दस्ताची अधिकृत नोंद घेतली जाते. ही गंभीर बाब जिल्हा वकील संघाच्या निदर्शनास आली. यावर वकील संघाने आमसभेत रितसर ठराव घेतला. तसेच अनधिकृतरित्या दुय्यम निबंधक कार्यालयात वावरणाऱ्या दलालांवर कायदेशीर कारवाई करण्याचीही नोंद आमसभेच्या ठरावात घेण्यात आली. हाच मुद्दा घेऊन जिल्हा वकील संघाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. अध्यक्ष ॲड. जितेंद्र बारडकर व सचिव ॲड. अमित बदनोरे यांनी वकील संघाच्यावतीने रितसर तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे. दस्त अधिकृत व्यक्तीकडूनच तयार व्हावेत, अशाच दस्तांची नोंदणी केली जावी, ही मागणी वकील संघाने केली आहे.  या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा आहे. 

  भूखंड घोटाळ्याला दलालच कारणीभूत - यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात भूखंड घोटाळा उघडकीस आला होता. आताही काही व्यवहार छुप्या पद्धतीने सुरू आहेत. या अनधिकृत व्यवहाराचे दस्त हे दलालांकडूनच तयार करण्यात आले होते. पोलीस तपासामध्ये न्यायालय परिसर व एलआयसी चौकातील काही झेरॉक्सची दुकाने सील करण्यात आली होती. कॉपी पेस्टच्या माध्यमातूनच खोटे दस्तावेज बनविले गेले. हा गैरप्रकार केवळ अधिकृत व्यक्तींकडून तयार झालेले दस्त नोंदविले जात नसल्याने घडला. दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील दलालराज संपुष्टात आणणे गरजेचे आहे. 

यवतमाळातच कायदा बदलतो का ?- महानगरांमध्ये कुठलाही दस्त हा अधिकृत व्यक्तीकडूनच तयार केला जातो. नोंदणीकृत दलाल किंवा विधीज्ञाकडून तयार झालेल्याच दस्ताची नोंद घेतली जाते. यवतमाळमध्ये मात्र असे होताना दिसत नाही. यामुळेच यवतमाळ शहरात मालमत्तेसंदर्भातील खोटे दस्त करून त्यांचा अधिकृत वापर केला जातो. दस्त नोंदणी करताना पडताळणी करणे आवश्यक आहे. कायदेशीर प्रक्रियेतून आलेला दस्तच नोंदविला जाणे गरजेचे आहे. यवतमाळसाठी महानगराचा कायदा नाही का, असाही प्रश्न उपस्थित होतो.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण