भरधाव जीप घरात शिरली

By Admin | Updated: March 13, 2016 02:52 IST2016-03-13T02:52:51+5:302016-03-13T02:52:51+5:30

चालकाचे नियंत्रण गेल्याने भरधाव क्रूझर जीप एका घरात शिरल्याने झालेल्या अपघातात महिला जखमी झाली.

The ferry jeep entered the house | भरधाव जीप घरात शिरली

भरधाव जीप घरात शिरली

पुसद : चालकाचे नियंत्रण गेल्याने भरधाव क्रूझर जीप एका घरात शिरल्याने झालेल्या अपघातात महिला जखमी झाली. ही घटना पुसद तालुक्यातील भोजला येथे शुक्रवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
कमल कैलास लकडे असे जखमी महिलेचे नाव असून तिच्या हाताला व पायाला जबर मार लागला आहे. लकडे परिवार नेहमीप्रमाणे आपल्या घरात झोपला होता. त्यावेळी पुसदहून जांबबाजारकडे जाणारी क्रूझर जीप (एम.एच-२९- आर-३३५६ ) त्यांच्या घरात शिरली. अचानक झालेल्या या प्रकाराने सर्वच जण गोंधळून गेले. या अपघातात घरात झोपलेल्या कमलाबाई जबर जखमी झाल्या. या अपघाताने घरातील साहित्याचीही नासधूस झाली.
सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावरून पोलिसांनी क्रूझर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The ferry jeep entered the house