शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

भरधाव बसने चार वाहने उडविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 21:57 IST

पुसद-महागाव रस्त्यावर भरधाव एसटी बसने दोन दुचाकी व दोन आॅटोरिक्षांना धडक दिली. या भीषण अपघातात ११ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. गुंज येथील साखर कारखान्याजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजता हा अपघात झाला.

ठळक मुद्दे११ जखमी : पुसद-महागाव रोडवर भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कगुंज : पुसद-महागाव रस्त्यावर भरधाव एसटी बसने दोन दुचाकी व दोन आॅटोरिक्षांना धडक दिली. या भीषण अपघातात ११ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. गुंज येथील साखर कारखान्याजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजता हा अपघात झाला.पुसदकडून येणाऱ्या बसने महागावकडून येणाऱ्या आॅटोरिक्षाला (क्र.एम.एच.२६/ए.सी.३००५) धडक दिली. दुसºयाच क्षणी मागोमाग आलेल्या दोन दुचाकींनाही (क्र.एम.एच.२९/बी.एच.११५० आणि एम.एच.२९/ए.व्ही.८९४७) उडवले. हा थरार संपत नाही तोच आणखी एका आॅटोरिक्षाला (क्र.एम.एच.२९/बी.डी. ००२७) धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार व आॅटोरिक्षामधील प्रवासी असे ११ जण जखमी झाले. जखमींमध्ये गजानन सुभाष चव्हाण (२८) रा.पुसद, प्रवीण सुर्वे (२८) रा.वरूड, केशव किसन गवस (५५) रा.बोरी ई., कैलास केशव आडे (३०) रा.गुंज, भीवा पुरी (३३) रा.गुंज, दिगांबर पुरी (३५) रा.गुंज, देवानंद पुरी (१२) रा.गुंज, नीलेश चिप्रजवार (३०) रा.दिग्रस, शंकर विठ्ठल पुरी (६०) रा.गुंज आदींचा समावेश आहे.जखमींना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुसद उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या बसचालकाचे नाव बादल राठोड असून तो पुसद आगाराचा कर्मचारी असल्याचे कळते. महागावचे पोलीस उपनिरीक्षक कैलास भगत घटनास्थळी पोहोचले. या अपघाताबाबत महागाव पोलीस अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात