स्त्री भ्रूणहत्या करणारे आतंकवाद्यांपेक्षाही भयंकर
By Admin | Updated: February 2, 2016 02:13 IST2016-02-02T02:13:34+5:302016-02-02T02:13:34+5:30
स्त्री भ्रूणहत्याही समाजाला लागलेली कीड असून, मुलींची गर्भातच हत्या करणारे समाजातील प्रतिष्ठीत अतिरेक्यांपेक्षाही देशाला घातक आहेत,..

स्त्री भ्रूणहत्या करणारे आतंकवाद्यांपेक्षाही भयंकर
गणेश राख : दिग्रस येथे कन्या दत्तक प्रोत्साहन योजनेला प्रारंभ
दिग्रस : स्त्री भ्रूणहत्याही समाजाला लागलेली कीड असून, मुलींची गर्भातच हत्या करणारे समाजातील प्रतिष्ठीत अतिरेक्यांपेक्षाही देशाला घातक आहेत, असे प्रतिपादन स्त्री भ्रूणहत्या विरोधी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. गणेश राख यांनी येथे केले.
ईश्वर प्रतिष्ठाणच्यावतीने कन्या दत्तक प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ शनिवारी येथील ईश्वर देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री संजय देशमुख, ईश्वर प्रतिष्ठाणच्या अध्यक्ष वैशाली देशमुख, प्रा.डॉ. छाया महाले, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त पौर्णिमा सवाई, माजी जिल्हा परिषद सदस्य सुमनताई राठोड उपस्थित होते. ईश्वर प्रतिष्ठाणच्या पुढाकारात कन्या दत्तक प्रोत्साहन योजना राबविली जाणार आहे. तसेच स्त्री भ्रूणहत्या थांबवावी म्हणून जनजागृती केली जाणार आहे. यावेळी नागपूर येथील मनोज गिरी, पुसद येथील अनिल वालकोंडावार, दिग्रस येथील विजय सोळंकी आदी कन्या दत्तक पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्राची गोल्हर, गोल्डी जांभुळकर, विरेंद्र बिजवे, कपील बोरुंदिया, प्रीती गावंडे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)