‘माणुसकीची भिंत’ सदस्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:41 IST2018-02-06T23:41:24+5:302018-02-06T23:41:34+5:30
येथील माणुसकीची भिंतच्या माध्यमातून नि:स्वार्थपणे गरजुंना मदत करणाºया सदस्यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘माणुसकीची भिंत’ सदस्यांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील माणुसकीची भिंतच्या माध्यमातून नि:स्वार्थपणे गरजुंना मदत करणाºया सदस्यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय बन्सल, प्रवीण नाईक, पांडुरंग व्यवहारे, प्रतीक पटेल, संदीप बिघाडे उपस्थित होते. यावेळी माणुकीच्या भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव, प्रल्हाद गुहाडे, प्रभाकर पाटील, मारोती काळे, सय्यद रोशन, संदीप आगलावे, आकाश शिंदे, मधुकर वाळूकर, रामदास सानप, बालाजी बंडेवार, जगत रावल, नितीन शेवाळकर, गजानन गिते यांचा सत्कार करण्यात आला.
गत दोन वर्षांपासून गोरगरिबांना कपडे व उपयोगी वस्तू माणुसकीच्या भिंततर्फे पुरविले जात आहे. तसेच दर रविवारी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम घेतला जातो. या कार्याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.