वनकर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By Admin | Updated: September 7, 2016 01:43 IST2016-09-07T01:43:51+5:302016-09-07T01:43:51+5:30

जिल्हा वनकर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि उल्लेखनीय कार्य कारणाऱ्या वनकर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Felicitation of Funeral and Healthy Students | वनकर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वनकर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

उल्लेखनीय कार्याची दखल : गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन केले प्रोत्साहित
यवतमाळ : जिल्हा वनकर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि उल्लेखनीय कार्य कारणाऱ्या वनकर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश कुमार होते. विभागीय वनअधिकारी अरुण मेत्रे, पतसंस्था अध्यक्ष किशोर पोहणकर उपस्थित होते. यावेळी अथर्व लिखार, सेजल मेश्राम, चंदन मेश्राम, अवंतिका आंबेकर, अश्विनी उपाध्ये, कोमल शेंडे, वैष्णवी नागमोते, रुचिका जिड्डेवार, सनन घोडाम, प्रकाश भेदूरकर, प्रियंका पंचगडे, अनिरुद्ध घुले, भाविका थेटे, वेदश्री जाधव, प्राजक्ता अलोणे, तेजस जक्कावार, जॉबाज काजी, केतन मडावी, प्रयास दांडगे आदी गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात आले. वनरक्षक अर्चना मेश्राम, लिना कांबळे, डी.पी.चव्हाण, वनपाल सुभाष लंबे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या सर्वसाधारण सभेत सभासदांना १० टक्के लाभांश वाटपाची घोषणा संस्थेचे अध्यक्ष किशोर पोहणकर यांनी केली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वनकर्मचारी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे संचालक एल.आर.गाडे यांनी केले.
सूत्रसंचालन कुशल रंगारी यांनी केले. तर आभार सचिव भास्कर मडावी यांनी मानले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष गणेश पावडे, विजय कडू, नितीन वानखडे, प्रशांत वाकूलकर, ज्ञानेश्वर महेशकर, सुरेश आंबेकर, रमेश बढे, बेबीबाई मडावी, विद्या घोडचर, राजेंद्र लिखार, अनंत निमसरकर, सचिन वर्मा, गोपाल जिरोणकर, प्रल्हाद राठोड, हिरानंद मिश्रा, धम्मानंद मेश्राम आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Felicitation of Funeral and Healthy Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.