दरोडेखोरांना जेरबंद करणाऱ्या धरती काळेंचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:01 IST2018-03-08T22:01:40+5:302018-03-08T22:01:40+5:30
शस्त्र व दोन गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा घालणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करणाऱ्या लेडी सिंघम पोलीस उपनिरीक्षक धरती काळे यांचा महिला दिनाचे औचित्य साधून येथील शहर ठाण्यात सत्कार करण्यात आला.

दरोडेखोरांना जेरबंद करणाऱ्या धरती काळेंचा सत्कार
आॅनलाईन लोकमत
पुसद : शस्त्र व दोन गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा घालणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करणाऱ्या लेडी सिंघम पोलीस उपनिरीक्षक धरती काळे यांचा महिला दिनाचे औचित्य साधून येथील शहर ठाण्यात सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी शहर ठाणेदार अनिलसिंह गौतम होते. प्रमुख पाहुणे म्हणून जय जवान माजी सैनिक असोसिएशनचे माजी सुभेदार डी.एम. तिवारी, सुभेदार नामदेव धुळधुळे, सुधीर राठोड, पॉलिथीनमुक्त कृती समितीचे प्रशांत गावंडे, जगदीश जाधव उपस्थित होते. पुसदची लेक असलेल्या धरती काळे यांनी पोलीस दलात धडाडीचे कार्य करीत आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये चेन्नईच्या एका व्यापाºयाला बंदूकीच्या धकावर लुटण्यात आले होते. यातील आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात पीएसआय धरती काळे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दलच त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सचिन भिताडे, गजानन सुरोसे, विष्णू वांझाळ, गोपाल सुरोसे, दत्ता इंगोले, उमेश दुधाने, संदीप जयस्वाल, योगेश वाशीमकर, प्रतीक चव्हाण, श्रीकांत गावंडे, राजेंद्र पुरी, आलमगीर खान, भारत कांबळे, संजय पवार, संतोष भगत, सागर जैन, अजय झोडगे, नरेश जाधव, गणेश भिसे, सागर जैन, शक्ती साठे, विजय डोंगरे, नरेश कोकाटे, मनोज साठे, शंकर मधने, सोमेश देशमुख, कार्तिक कट्टे यांच्यासह पोलीस गोपाल वास्टर, मुन्ना आडे उपस्थित होते. संचालन मारोती भस्मे यांनी केले.