विना अपघात सेवा देणाऱ्या चालकाचा सत्कार
By Admin | Updated: April 24, 2017 00:09 IST2017-04-24T00:09:26+5:302017-04-24T00:09:26+5:30
एसटी महामंडळातील २७ वर्षांच्या सेवा काळात २५ वर्षे विना अपघात सेवा देणारे चालक ज्ञानेश्वर विठोबाजी हजारे यांचा सत्कार करण्यात आला.

विना अपघात सेवा देणाऱ्या चालकाचा सत्कार
यवतमाळ : एसटी महामंडळातील २७ वर्षांच्या सेवा काळात २५ वर्षे विना अपघात सेवा देणारे चालक ज्ञानेश्वर विठोबाजी हजारे यांचा सत्कार करण्यात आला. नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. एसटी चालकाला शासकीय स्तरावर प्रथमच हा बहुमान प्राप्त झाला असल्याचे सत्कारप्रसंगी एसटी कामगार सेनेचे गणेश गावंडे, अरुण गाडगे, सुरेश कनाके, प्रदीप वानखडे, अशोक कांबळे, अशोक भोवते, शैलेश जगदाडे, राजू मिरासे, तुळश्ीदास वनवे, श्रीधर कपिले, विनोद बलखंडे, प्रवीण मेश्राम, प्रवीण कुडमेथे, विनोद हरणखेडे, ओमप्रकाश वैद्यवार, रिंकू भोयर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)