शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

अन्नपूर्णाच्या कुटुंबावर मदतीचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:10 PM

दिव्यांग असलेले आई-वडील आणि घरच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडून भीक मागण्याची वेळ आलेल्या दारव्हा येथील अन्नपूर्णा शिंदेच्या परिवारावर अक्षरश: मदतीचा वर्षाव झाला.

ठळक मुद्देदारव्हा येथे मानवतेचे दर्शन : शिवसेनेसह अनेकांचा मदतीचा हात, शिक्षणासाठी पुढाकार

आॅनलाईन लोकमतदारव्हा : दिव्यांग असलेले आई-वडील आणि घरच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडून भीक मागण्याची वेळ आलेल्या दारव्हा येथील अन्नपूर्णा शिंदेच्या परिवारावर अक्षरश: मदतीचा वर्षाव झाला. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच समाजातील दानशूर व्यक्तींनी मानवतेचे दर्शन घडविले.‘लोकमत’मध्ये शनिवारच्या अंकात ‘सातव्या वर्गातल्या ‘अन्नपूर्णे’वर भीक्षा मागण्याची वेळ’ असे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताने समाजमन गहिवरून गेले. अन्नपूर्णा शिंदे आणि तिच्या परिवाराच्या मदतीसाठी अनेक जण धावून आले. शिवसेना पदाधिकाºयांनी या कुटुंबाला भरीव मदत केली. तसेच अनेकांनी तिच्या घरी जाऊन आर्थिक मदतही केली. येथील शिवनगरात राहणारे अन्नपूर्णाचे वडील दोनही डोळ्यांनी अंध आहे. तर आई पोलिओमुळे लुळी झाली आहे. अशा परिस्थितीत अन्नपूर्णा वडिलांना भीक मागण्यासाठी मदत करीत होती. यासाठी तिला शाळाही सोडावी लागली. तिची ही कहानी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली आणि मदतीचा ओघ सुरू झाला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या सूचेनवरून शिवसेना पदाधिकाºयांनी अन्नपूर्णाचे घर गाठले. तिच्या अडचणी जाणून घेतल्या. नगरसेवक शरद गुल्हाने यांनी निराधार खात्यात किमान बचत ठेव म्हणून तत्काळ मदत केली. तसेच छोटा व्यवसाय म्हणून गोळ्या-बिस्कीटचे दुकान लावून देण्याची व्यवस्था केली. प्रेमसिंग चव्हाण, पंचायत समिती उपसभापती पंडित राठोड, नामदेव जाधव यांनी पीठगिरणी व्यवसाय सुरू करण्याची व्यवस्था केली. रवी वांड्रसवार यांनी सायकल भेट दिली. नगरपरिषद सभापती रवी तरटे यांनी कुटुंबातील प्रत्येकाला कपडे तर गजेंद्र चव्हाण यांनी अन्नपूर्णाच्या शिकवणीच्या फीची व्यवस्था केली. राम मते यांनी दोनही मुलींना ड्रार्इंगचे प्रशिक्षण देण्याचे ठरविले.शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज सिंगी, नगरसेवक प्रकाश गोकुळे आदींनी मदतीचा हात पुढे केला. चैतन्य ग्रुपचे गणेश भोयर, ओंकार निमकर, गणेश पुसदकर, राहुल बोरकर यावेळी उपस्थित होते. त्याच सोबत घाटंजीच्या विकास गंगा संस्थेचे अध्यक्ष रणजित बोबडे, विनोद गुजलवार, विजय गरड, अनिकेत संस्था दिग्रसचे रवी राऊत, स्वीकार अ‍ॅग्रो प्रोड्युसरचे अध्यक्ष सुधाकर दरेकार आदींनी भेट घेऊन केअरिंग फ्रेन्डस् मुंबईच्या सहकार्याने छबूताई बोबडे यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचा धनादेश दिला. यवतमाळ येथील उद्धार संस्थेचे समिश नाठार, रवींद्र तिवारी यांनी रोख चार हजार रुपये, पुसदचे संजय आसोले, उत्तमलाल रामधनी, दारव्हा येथील राहुल मते यांनी रोख मदत केली. तसेच शैक्षणिक साहित्य व शालेय पोषाख देण्याचे आश्वासन दिले.माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष अशोक चिरडे, डॉ. मनोज राठोड, डॉ. रुपेश खंदाडे, वाशिमचे डॉ. राहुल महाले, गजानन दुधे, प्रभाकर माकोडे, वैभव भेंडे यासह अनेकांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी संपर्क साधून मदतीची तयारी दर्शविली. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्याने शिंदे कुटुंबियांना मदतीचा हात मिळाला. ‘लोकमत’प्रती शिंदे परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली.