आर्णीत शेतकºयांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:47 IST2017-08-26T21:47:17+5:302017-08-26T21:47:37+5:30

शासनाकडून कर्जमाफी ची घोषणा झाली परंतु शेतकºयांची परवड मात्र थांबलेली नाही. कर्जमाफीचा अर्ज आॅनलाईन भरावयाचा असल्याने शेतकºयाला हा अर्ज भरण्यासाठी सेतूसमोर तासन्तास उभे राहावे लागत आहे.

Feedback of Farmers | आर्णीत शेतकºयांची परवड

आर्णीत शेतकºयांची परवड

ठळक मुद्देवारंवार लिंक फेल : कर्जमाफीचा अर्ज भरताना बेहाल

हरिओम बघेल।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : शासनाकडून कर्जमाफी ची घोषणा झाली परंतु शेतकºयांची परवड मात्र थांबलेली नाही. कर्जमाफीचा अर्ज आॅनलाईन भरावयाचा असल्याने शेतकºयाला हा अर्ज भरण्यासाठी सेतूसमोर तासन्तास उभे राहावे लागत आहे. लिंक वारंवार फेल होत आहे. एक अर्ज भरायला चार ते पाच तास वाट पाहावी लागत आहे. सोबतच सेतु सुविधा केंद्राकडून शंभर रुपयेसुद्धा घेण्यात येत असल्याचे पुढे आले आहे.
कर्जमाफीच्या फॉर्म भरण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकरी बेहाल झाला आहे. यासाठी शासनाकडून ग्रामपंचायत स्तरावर फॉर्म भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याचे म्हटले आहे. परंतु वास्तव मात्र वेगळे आहे. अनेक ग्रामपंचायत कार्यालयात विद्यतु पुरवठा योग्यरित्या व सुरळीत होत नाही. नेटचे कनेक्शन नाही, अशा वेगवेगळ्या व विविध समस्या आहेत. काही ग्रामपंचायतमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे, परंतु सर्व्हर डाऊन होत आहे. यामुळे गावातसुद्धा अनेक अडचणींचा सामना शेतकरी वर्गाला करावा लागत आहे.
१५ सप्टेंबरपर्यंत ही मुदत दिली आहे. त्यामुळे आता येत्या दिवसात ही बेबसाईड बिझी राहिल व यात शेतकरी वर्गाला अडचणींचा सामना करावा लागेल, हे निश्चित. यामध्ये वयोवृद्ध, महिला शेतकरी वर्गाचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी दूरवरून नागरिक शहराच्या ठिकाणी दाखल होत आहे.

Web Title: Feedback of Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.