शुल्कमाफी वर्षभरानंतर
By Admin | Updated: February 18, 2017 04:04 IST2017-02-18T04:04:28+5:302017-02-18T04:04:28+5:30
गेल्या वर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने दहावी, बारावीचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले होते. परीक्षा मंडळाच्या दीर्घ पाठपुराव्यानंतर

शुल्कमाफी वर्षभरानंतर
अविनाश साबापुरे / यवतमाळ
गेल्या वर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने दहावी, बारावीचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले होते. परीक्षा मंडळाच्या दीर्घ पाठपुराव्यानंतर अखेर शुल्क माफीपोटी १८ लाख ६० हजार रुपयांची प्रतिपूर्ती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी परीक्षा शुल्क माफीचा निर्णय उशिरा झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शुल्क भरून झालेही होते. अशा विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती म्हणून प्रत्येकी ३१० रुपये शासन परत करणार होते. त्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती परीक्षा मंडळाकडे देणे आवश्यक होते. परीक्षा मंडळाच्या सूचनेनंतर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी ५ हजार ४७७ विद्यार्थ्यांची माहिती आॅक्टोबरमध्ये दिली. यात दहावीच्या ४ हजार २५८ तर बारावीच्या १ हजार २१९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, या यादीतील बहुतांश विद्यार्थ्यांची माहिती अपूर्ण देण्यात आली. हजेरी क्रमांक, त्यांचा बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड आदी माहिती पुरविण्यात आली नाही. तसेच विद्यार्थ्याचे मूळ गाव टंचाईग्रस्त यादीत असल्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे २ जानेवारीला परीक्षा मंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे विद्यार्थ्यांची यादी परत पाठविली.