अल्पवयीन वाहन चालकांमुळे भय

By Admin | Updated: September 5, 2014 00:08 IST2014-09-05T00:08:57+5:302014-09-05T00:08:57+5:30

बेजबाबदार वर्तनाने दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणारे अल्पवयीन वाहन चालक रस्त्याने वाहने हाकलत असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे़ ते सुसाट वेगाने ‘धूम’ ठोकून

Fear of minor drivers | अल्पवयीन वाहन चालकांमुळे भय

अल्पवयीन वाहन चालकांमुळे भय

पोलिसांचे दुर्लक्ष : अपघाताची भीती वाढली
नांदेपेरा : बेजबाबदार वर्तनाने दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणारे अल्पवयीन वाहन चालक रस्त्याने वाहने हाकलत असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे़ ते सुसाट वेगाने ‘धूम’ ठोकून वाहने चालवतात. त्यामुळे इतर वाहनधारकांनाच भय निर्माण झाले आहे.
अल्पवयीन वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी असतात. त्यांच्याकडे कुठलाही वाहन चालक परवानाही नसतो. तरीही ते छातीठोकपणे शहरासह ग्रामीण भागात वाहन चालवीत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ त्यांच्या सुसाट वेगाने इतर वाहन चालकांच्या हृदयाची धडपड वाढली असून त्यांच्यात भितीही निर्माण झाली आहे़
सुसाट वाहन पळवणाऱ्या अल्पवयीन वाहन चालकांमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे़ ही अल्पवयीन मुले निर्धारित वेगापेक्षा जादा वेगाने वाहन चालवितात. ते दुसऱ्यांच्या जिवाची पर्वाच करीत नाही़ ते समोरच्या वाहनाला क्षणात ‘कट’ मारून भरधाव वेगाने निघूनही जातात़ हल्ली आॅटोरिक्षाही असे अल्पवयीन चालकच हाकलत असल्याचे दिसून येते.
त्यामुळे आॅटोरिक्षाच्या अपघातांमध्येही वाढत होत असल्याचे दिसून येत आहे. आॅटोरिक्षा चालक ही ग्राहक मिळविण्याच्या उद्देशाने आपले वाहन आडवे-तिडवे रस्त्यामध्ये उभे करतात़ या सर्व प्रकाराकडे वाहतूक पोलीस निमूटपणे बघतात. काही कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस रस्त्यात वाहन चालकांची चौकशी करतात.
मुले घरून वाहन घेऊन निघतात. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसतो. मात्र पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी मुले वचरढ होतात. त्यांना वाहन चालविण्यात मजा येते. ही मजा अपघातासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या हातात वाहन देणे कितपत योग्य आहे, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
अशा अल्पवनीय वाहन चालकांमुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र तरीही त्यांनी कठोरपणे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा शहर व ग्रामीण भागात अल्पवयीन वाहन चालकांमुळे दुसऱ्याचा नाहक बळी जाण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

Web Title: Fear of minor drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.