नळाचे मीटर व पेटी खरेदीवरून आरोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:09+5:30

पाणी मीटर बसविण्याच्या निवेदनाप्रमाणे प्राकलनात नमूद बाबींची अपूर्तता, मीटर जोडणी साहित्यात, नकाशात तफावत, ५० लाख रुपयांचा नगरपंचायतला नाहक भुर्दंड, पाणी मीटरचा सुमार दर्जा, प्लास्टिकचे मीटर व पेटी आदींबाबत आक्षेप असल्याचे नोंदविण्यात आले आहे. यात घोटाळा करण्यात आल्याने पुरवठादाराचे देयक थांबविण्यात यावे, असे तक्रारीत म्हटले आहे.

Faucet charges on tube meter and box purchases | नळाचे मीटर व पेटी खरेदीवरून आरोपांच्या फैरी

नळाचे मीटर व पेटी खरेदीवरून आरोपांच्या फैरी

ठळक मुद्देराळेगाव नगरपंचायत : सुमार दर्जाचे साहित्य, कंत्राटदाराचे देयक थांबविण्याची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : येथील नगरपंचायतीत ५० लाख रुपयांचे एक हजार २०० पाणी मीटर खरेदी करण्यात आले आहे. यावरून विरोधक व सत्तारूढ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत.
विरोधी नगरसेवक बबनराव भोंगारे, बांधकाम सभापती भालचंद्र कवीश्वर, किशोर जुनुनकर, छायाताई पिंपरे, अरुण शिवनकर, सविता पोटदुखे, वनिता दुर्गे आदींनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.
पाणी मीटर बसविण्याच्या निवेदनाप्रमाणे प्राकलनात नमूद बाबींची अपूर्तता, मीटर जोडणी साहित्यात, नकाशात तफावत, ५० लाख रुपयांचा नगरपंचायतला नाहक भुर्दंड, पाणी मीटरचा सुमार दर्जा, प्लास्टिकचे मीटर व पेटी आदींबाबत आक्षेप असल्याचे नोंदविण्यात आले आहे. यात घोटाळा करण्यात आल्याने पुरवठादाराचे देयक थांबविण्यात यावे, असे तक्रारीत म्हटले आहे.
या संदर्भात नगरपंचायतच्या अध्यक्ष मालाताई खसाळे म्हणाल्या, नगरोत्थान योजनेंतर्गत पाणी मीटर बसविण्याबाबत २३ जानेवारी २०१८ रोजी नगरपंचायतीत ठराव घेण्यात आला होता. या ठरावाचे सूचक तत्कालीन उपाध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल चव्हाण, तर अनुमोदक अरुण शिवनकर होते. बबन भोंगारे अध्यक्ष असताना हा ठराव घेण्यात आला होता. तक्रारकर्ते व अधिकारी यांच्या निरसन झाल्यानंतर मीटर लावण्याबाबत ठरविले जाईल, पुरवठादाराला देयक देण्याबाबत मुख्याधिकारी निर्णय घेतील.

Web Title: Faucet charges on tube meter and box purchases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.