मुकूटबन-मांगली मार्गावर जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 21:12 IST2019-07-13T21:11:51+5:302019-07-13T21:12:11+5:30
तालुक्यातील मुकूटबन-पाटण-रूईकोट ते मांगलीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा रूंदीकरणाच्या नावाखाली माती टाकण्यात आली आहे. मात्र पावसामुळे आता तेथे चिखल निर्माण झाल्याने या रस्त्यावर वाहने फसत आहे.

मुकूटबन-मांगली मार्गावर जीवघेणा प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
झरी : तालुक्यातील मुकूटबन-पाटण-रूईकोट ते मांगलीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा रूंदीकरणाच्या नावाखाली माती टाकण्यात आली आहे. मात्र पावसामुळे आता तेथे चिखल निर्माण झाल्याने या रस्त्यावर वाहने फसत आहे.
हा रस्ता अरूंद असल्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या बाजुला माती टाकण्यात आली. मात्र त्याची व्यवस्थित दबाई न झाल्यामुळे तेथून वाहने काढताना चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर समोरून येणाºया वाहनाला साईड देताना चालकांना मोठी कसरतच करावी लागते. अनेकदा या रस्त्यावर वाहने फसत असल्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा होतो.
त्याचबरोबर या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किरकोळ अपघातही घडत आहेत. त्याचबरोबर समोरून एखादी मोठे वाहन आल्यास दुचाकीचालकांना आपली दुचाकी चिखलताच नेऊन उभी करावी लागे. परिणामी त्यांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी या मार्गावरून ये-जा करणाºया वाहनचालकांकडून होत आहे.