शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

बस-ट्रकचा भीषण अपघात, दाेघांचा जागीच मृत्यू; आठ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 22:38 IST

वणी-यवतमाळ राज्य मार्गावरील घटना

मारेगाव/करंजी/पांढरकवडा (यवतमाळ) : भरधाव ट्रक व बसमध्ये समाेरासमाेर धडक हाेवून भीषण अपघात झाला. यात दाेन प्रवासी जागीच ठार झाले तर आठ जण गंभीर आणि दाेघे किरकाेळ जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री ८:२० वाजेच्या सुमारास वणी-यवतमाळ राज्य मार्गावरील जळका फाट्यावर घडली.

नवनाथ शिवाजी काचे (वय ३०, रा. अंकुलगा, जि. लातुर), भीमराव मरस्कोल्हे (वय ५०, रा. मंगी, ता. केळापूर) अशी मृतांची नावे आहेत. शुभम ढोंबरे, रोहित योकनकर रा. मोहदा, सचिन झिलपे रा. बोटोनी, अमोल टेकसे रा. मेटीखेडा, संतोष खिलके रा. किंगा, प्रसाद चिंचोळकर रा. मेटीखेडा, विमल मरस्कोल्हे रा. मंगी, दुर्गा ठाकरे रा. ब्रम्हपुरी, नरेंद्र मडावी रा. मंगी, भीमराव मडावी रा. मंगी अशी गंभीर जखमींची नावे असून, त्यांना उपचारार्थ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. इतर दोन किरकोळ जखमींना पांढरकवडा येथील रुग्णालयात भरती केले आहे.

एमएच ४० वाय ५७८२ क्रमांकाची बस वणी येथून यवतमाळला जात होती. तर एमएच २८ बीबी ५८२७ क्रमांकाचा ट्रक वणीकडे येत हाेता. दाेन्ही वाहनांमध्ये जाेरदार धडक बसली. या अपघातात बस एका बाजूने पूर्णत: कापल्या गेली. अपघात घडताच चालक बेशुद्ध पडल्याने बस २०० मीटर लांब जात रस्त्याच्या खाली उतरून थांबली. यावेळी वणीचे आमदार संजय देरकर जळका येथे सार्वजनिक कार्यक्रमासाठी आले असता अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. सर्व जखमी व मृतांना गावकऱ्यांच्या सहकार्याने करंजी व पांढरकवडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. बसमध्ये १५ प्रवासी, चालक, वाहक हाेते. यात नवनाथ काचे, भीमराव मरस्कोल्हे हे दाेन प्रवासी जागीच ठार झाले तर इतर प्रवासी जखमी झाले. याप्रकरणी पाेलिसांनी नाेंद घेतली असून, अधिक तपास सुरू आहे.जेवणाचा डबा घेतल्यानंतर काही अंतरावरच अपघात

बसचे कंडक्टर सचिन दौलत झिलपे हे बोटोनी गावचे रहिवासी असून, त्यांनी घरून जेवणाचा डबा घेतल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच अपघात झाला. दरम्यान, प्रल्हाद अरविंद चिंचोळकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bus-truck collision kills two, injures eight near Yavatmal.

Web Summary : A bus and truck collided head-on near Yavatmal, killing two and seriously injuring eight. The accident occurred on the Wani-Yavatmal highway. Injured were shifted to hospitals in Yavatmal and Pandharkawda. Police are investigating.
टॅग्स :Accidentअपघात