कर्जमाफीसाठी ‘उपोषण सत्याग्रह’
By Admin | Updated: April 29, 2015 23:57 IST2015-04-29T23:57:51+5:302015-04-29T23:57:51+5:30
भाजप सरकारने सत्तेत येण्यापुर्वी कर्जबाजारी शेतकऱ्यांना एकदाचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे अभिवचन दिले होते.

कर्जमाफीसाठी ‘उपोषण सत्याग्रह’
‘विजस’ : १ मेपासून आंदोलन
यवतमाळ : भाजप सरकारने सत्तेत येण्यापुर्वी कर्जबाजारी शेतकऱ्यांना एकदाचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे अभिवचन दिले होते. आता याच अभिवचनाची पूर्तता शासनाने करावी यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिला उपोषण सत्यासग्रह करणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासूनच या सत्याग्रहाची सुरूवात होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवडणूक प्रचार सभेत २१ मार्च वर्धा व दाभाडी येथे शेतकरी आत्महत्या कजार्मुळे व शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे होत असून मला सत्तेवर आणा मी सर्व शेतकऱ्यांना नव्याने बँकांची दारे खुली करतो व पिक कर्ज देतो, तसेच शेती नफ्याची होण्यासाठी शेतीमालाचा हमीभाव लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा व या हमीभावावर सर्व शेतीमालाची सरकारकडून खरेदी करण्याची गाव्ही दिली होती. केंद्रात व राज्यात अमर्याद सत्ता आल्यानंतर सातबारा कोरा करण्याचे, लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देण्याच्या आश्वासनाचा केंद्र व राज्य सरकारला सोयीने विसर पडला आहे. आता कर्ज मुक्तीसाठी शेतकऱ्यांना सरकारला बाध्य करण्यासाठी शेतकऱ्यांचे सर्व पक्ष, पंथ व विचार सोडून करा वा मारा असे टोकाचे आंदोलन सुरु करण्याची घोषणा शेतकरी नेते व विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी केली आहे. येत्या १ मे महाराष्ट्र दिनी सरकारला निर्वाणीचा ईशारा देण्यासाठी शेकडो शेतकरी विधवा व दुष्काळग्रस्त शेतकरी पांढरकवडा येथे उपोषण सत्ताग्रह करतील, अशी माहीती विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या सचिव अपर्णा मालीकर यांनी दिली. विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या बेबीताई बैस, भारती पवार, चंद्रकला मेश्राम, अर्चना राऊत, अंजूबाई भुसारी, इंदूताई आष्टेकर, सुनीता पेंदोरे, जनाबाई घोडाम यांनी सर्व शेतकऱ्यांना ‘सात बारा कोरा करा’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे .
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, पीककर्ज, दुष्काळग्रस्त, तणावग्रस्त मदतीच्या पॅकेजमुळे शेतकरी आत्महत्या कमी होऊ शकत नाही. यासाठी फक्त नाले रुंदीकरण हाच एकमेव पर्याय आहे, अशी मुक्ताफळे दररोज फोडत आहे, भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेती विकास व तणावग्रस्त शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी कर्जमुक्ती व हमीभाव वाढ या गरजापूतीर्साठी आवश्यक असलेली दिशा, धोरणे राबविण्यास अपयशी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे पीक आले आहे. या अपयशाची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या बेबीताई बैस यांनी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
आश्वासन पूर्ततेची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याची गरज आहे.