खडकीच्या शेतकऱ्याचे राळेगाव येथे उपोषण
By Admin | Updated: December 25, 2016 02:37 IST2016-12-25T02:37:39+5:302016-12-25T02:37:39+5:30
वहितीत असलेल्या शेतजमिनीवरील गौण खनिजाचे खनन थांबविण्यात यावे, या मागणीसाठी खडकी(वडकी)

खडकीच्या शेतकऱ्याचे राळेगाव येथे उपोषण
राळेगाव : वहितीत असलेल्या शेतजमिनीवरील गौण खनिजाचे खनन थांबविण्यात यावे, या मागणीसाठी खडकी(वडकी) येथील रामेश्वर फकिरा पढाल यांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
आईच्या नावे असलेली शेती रामेश्वर पढाल हे करत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीच्या भरवशावर चालतो. वडकी रस्त्याच्या कामासाठी याच शेतातून गौण खनिजाचे खनन केले. त्यामुळे जागोजागी खड्डे तयार झाले आहे. संपूर्ण शेत खराब झाले असल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केले. तसे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. (प्रतिनिधी)