शेतकऱ्यांची कार्यशाळा
By Admin | Updated: October 15, 2014 23:25 IST2014-10-15T23:25:29+5:302014-10-15T23:25:29+5:30
तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे तालुक्यातील अकोली (खु़) येथे कापूस पिकांवरील लाल्या रोगाचे व्यवस्थापन व सोयाबीन पीक काढणीबाबत १२ आॅक्टोबरला शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली़

शेतकऱ्यांची कार्यशाळा
पांढरकवडा : तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे तालुक्यातील अकोली (खु़) येथे कापूस पिकांवरील लाल्या रोगाचे व्यवस्थापन व सोयाबीन पीक काढणीबाबत १२ आॅक्टोबरला शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली़
तालुक्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र हे कापूस आहे़ सध्या आॅक्टोबर महिना असल्यामुळे तापमान जास्त आहे़ त्यामुळे कापूस पिकावर लाल्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़ लाल्या हा रोग नसून सुक्ष्म मूल्यद्रव्यांची कमतरता असल्याने त्याचा प्रादुर्भाव कापूस पिकांवर दिसून येतो़ सदर कार्यशाळेत कृषी सहाय्यक सोमनाथ जाधव यांनी लाल्या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी मॅग्नेशिअम सल्फेट व युरियाचा वापर करण्याची सूचना केली. या कार्यशाळेत मंडळ कृषी अधिकारी आऱआऱआत्राम यांनी सोयाबीन पीक काढणी, या विषयावर मार्गदर्शन केले. कृष्णा पोळ यांनीही मार्गदर्शन केले़ उपविभागीय कृषी अधिकारी सोनाली कवडे, अकोली येथील माधव तोटावार, गोवर्धन बेले, सुभाष शेख, प्रमोद वाढई आदी शेतकरी कार्यशाळेला उपस्थित होते़ वामन अनमुलवार यांच्या शेतात ही कार्यशाळा घेण्यात आली. (वार्ताहर)