शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 10:30 AM

१६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्दे१६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती  व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. गेल्या चार महिन्यापासून  नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे.पुरामुळे ७९  गावातील २ हजार ८१५ शेतकऱ्यांच्या ११ हजार ९३ हेक्टर क्षेत्रावरील शेतातील पिकांचे व ३०१ घरांचे नुकसान झाले.

मुकेश इंगोले

यवतमाळ -  तालुक्‍यात १६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती  व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

अतिवृष्टी व नदी-नाल्यांच्या पुरामुळे ७९  गावातील २ हजार ८१५ शेतकऱ्यांच्या ११ हजार ९३ हेक्टर क्षेत्रावरील शेतातील पिकांचे व ३०१ घरांचे नुकसान झाले. यानुकसानीचे सर्वक्षण करुन अहवाल पाठविण्यात आला आहे. दारव्हा तालुक्याला १५ व १६ ऑगस्टला पावसाने जबरदस्त तडाखा दिला. पंधरा तासात १२१.४२ मीमी पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातील सर्व छोटे-मोठे प्रकल्प नदी-नाले तुडुंब भरले.काही ठिकाणी पाझर तलाव फुटल्यामुळे पाणी गावात व शेतात घुसले त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. दारव्हा तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०५ मी.मी.आहे. या दोन दिवसांच्या पावसामुळे मोठी भर पडली. एकूण ६५९.८६ मी. मी.पाऊस पडला. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच वार्षिक सरासरीच्या जवळपास आकडा पोहोचला. यावरून या अतिवृष्टीचा अंदाज येऊ शकतो.

मोठ्या प्रमाणातील पावसामुळे सर्व छोटे-मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. नदी नाल्यांना पूर आला. त्याचबरोबर वरून जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे सर्व पाणी शेतात जमा झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी तालुक्यात ३३ह जार चारशे हेक्टर कापूस, २२ हजार तीनशे हेक्टर सोयाबीन, ८ हजार पाचशे हेक्टर तुर, ४०९ हेक्टर मुग, ३६५ हेक्टर उडीद यासह फळबाग व इतर पिकाची लागवड झाली. यामधील झालेल्या नुकसानीच्या सर्वेनंतर ७९ गावातील २ हजार ८१६ शेतकऱ्यांचे ९ हजार ९१८.१५ हेक्टर ३३ टक्केच्या वर तर १ हजार ९१८.११ हेक्टरवरील शेती खरडुन गेल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर ३०१ घरांची पडझड होऊन जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले. ४६ जनावरे मृत्युमुखी पडली. यातील ३०१ कुटुंबांना १४ लाख ९५ हजार रूपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. तर पशुधन खरेदीसाठी ४ लाख ७ हजाराची मदत देण्यात आली. मात्र शेतीच्या नुकसानाची भरपाई अद्यापही मिळाली नाही त्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

दोन हेक्टरची मदत मिळेल 

ओलीत पिकांना हेक्टरी १३ हजार पाचशे, कोरडवाहु ६ हजार आठशे तर खरडलेल्या जमिनीची ३ हजार ७५९ रुपये मदत मिळेल मात्र त्यातही दोन हेक्टरची मर्यादा असेल.झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत तोकडी आहे.आणी तीसुद्धा चार महीने होऊन गेले तरी शेतकऱ्यांच्या हातात अजुनपर्यंत पडली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरीagricultureशेती