यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: May 18, 2017 18:38 IST2017-05-18T18:38:13+5:302017-05-18T18:38:13+5:30
दिग्रस तालुक्यातील कादंळी येथील शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
दिग्रस तालुक्यातील कादंळी येथील शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
संजय शंकर येवले (३५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. संजयने विष प्राशन केल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत संजय येवले यांच्यावर कर्ज असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.