कीटकनाशकाच्या दरामुळे शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:46 IST2021-08-28T04:46:46+5:302021-08-28T04:46:46+5:30
शासकीय कार्यालयात स्वच्छतेची गरज पांढरकवडा : शहरात शासकीय कार्यालयाची संख्या मोठी असून, या शासकीय कार्यालयात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात ...

कीटकनाशकाच्या दरामुळे शेतकरी त्रस्त
शासकीय कार्यालयात स्वच्छतेची गरज
पांढरकवडा : शहरात शासकीय कार्यालयाची संख्या मोठी असून, या शासकीय कार्यालयात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. कार्यालयाच्या परिसरात झाडे, झुडपे वाढली आहे. भिंतीवर पिचकाऱ्या मारून असल्याने तसेच पाणी वाहते दिसून येते. याठिकाणी दुर्गंधीसुद्धा येत असल्याने तसेच परिसरात डासांचे प्रमाणही वाढल्याने तेथे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पांढरकवडात डासांचा प्रादुर्भाव वाढला
पांढरकवडा : शहरासह ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आधीच शहरात डेंग्यू व इतर आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातच शहरात जागोजागी अस्वच्छता असून, अनेक रोगांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे शहरात धूर फवारणी करण्याची मागणी केली जात आहे.
वातावरणातील बदलामुळे भीती
पांढरकवडा : वातावरणातील सततच्या बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी यासारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे. शहरात व तालुक्यात अनेकांना या आजाराची लागण झाली असून, दवाखान्यातही रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.