कृषी मंत्रालयात नोकरीचे आमिष देऊन शेतकरी पुत्राची फसवणूक

By Admin | Updated: September 11, 2015 02:53 IST2015-09-11T02:53:28+5:302015-09-11T02:53:28+5:30

केंद्रीय कृषी मंत्रालयात नोकरीचे प्रलोभन दाखवून एका तरुणाला २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार.....

Farmer's son's betrayal by giving a bribe to the Agriculture Ministry | कृषी मंत्रालयात नोकरीचे आमिष देऊन शेतकरी पुत्राची फसवणूक

कृषी मंत्रालयात नोकरीचे आमिष देऊन शेतकरी पुत्राची फसवणूक

खैरगावचा तरुण : दागिने विकून भरले २० हजार
हमीदखान पठाण अकोलाबाजार
केंद्रीय कृषी मंत्रालयात नोकरीचे प्रलोभन दाखवून एका तरुणाला २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार यवतमाळ तालुक्यातील खैरगाव येथे उघडकीस आला. तरुणाने आईचे दागिने विकून सदर पैसे भरले.
सोमेश्वर मोहन पवार असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. तो नागपूर येथे एका खासगी बँकेत नोकरी करतो. एका वृत्तपत्रातील जाहीरातीवरून त्याने आॅनलाईन मुलाखत दिली. त्यांनतर त्याला किसान सेवा केंद्र, किसान भवन, ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) असे एक पत्र प्राप्त झाले. त्यात मुलाखतीमध्ये यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. तसेच ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून नियुक्त झाल्याचे सांगण्यात आले. १८ हजार ५०० रुपये वेतन देणार असल्याचे पत्रात नमूद आहे. मात्र यासाठी त्याला किसान सेवा केंद्राच्या खात्यात १४ हजार ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. नोकरी मिळत असल्याने सोमेश्वर ने १० जुलै रोजी ती रक्कम बँक आॅफ अमेरिकामध्ये जमा केली. बँकेत भरलेल्या रकमेच्या पावत्यांची झेरॉक्स केंद्र प्रतिनिधीला दाखवून मोबाईल फोन व लॅपटॉप हस्तगत करण्याचे सूचविण्यात आले. त्यानंतर काही दिवसात पुन्हा एकदा पाच हजार रुपये खात्यात भरण्याकरिता मोबाईलवर संदेश आला. सोमेश्वरने पाच हजार रुपये भरले. एकूण १९ हजार ५०० रुपये भरले. नोकरीच्या आशेने त्याने दागिने विकून ही रक्कम भरली होती. दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही नोकरी मिळाली नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Web Title: Farmer's son's betrayal by giving a bribe to the Agriculture Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.