शेतकऱ्यांनी कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:26 IST2018-03-10T23:26:37+5:302018-03-10T23:26:37+5:30
पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढीसाठी शेतकरी गटांनी निव्वळ बचत न करता आर्थिक उत्पन्न वाढीकरिता कृषिपूरक व्यवसाय सुरू करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.डी. जाधव यांनी केले.

शेतकऱ्यांनी कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे
ऑनलाईन लोकमत
दिग्रस : पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढीसाठी शेतकरी गटांनी निव्वळ बचत न करता आर्थिक उत्पन्न वाढीकरिता कृषिपूरक व्यवसाय सुरू करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.डी. जाधव यांनी केले.
येथील जिजामाता सभागृहात शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यावेळी बोलताना जाधव म्हणाले, कृषी विभागातर्फे शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, कृषिमाल प्रक्रिया, पणन आदींवर लक्ष दिले जात आहे. त्याअनुषंगाने राबविण्यात येणाºया योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक डी.बी. काळे, जिल्हा रेशीम प्रकल्प अधिकारी बावगे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. नंदकिशोर हिवरे, डॉ. प्रशांत राऊत, कृषीभूषण गणेश मात्रे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी होत असल्याने आधुनिक पद्धतीने काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकरी गटांना कृषिपूरक व्यवसायाकरिता सामूहिकरित्या दालमिल, अवजारे बँक, सेंद्रिय शेती, ग्राम बिजोत्पादन, कृषी निविष्टा विक्री केंद्र, प्रक्रिया उद्योग, प्रशिक्षण व अभ्यास दौरे, प्रात्याक्षीक आदी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गट शेतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे शेतकरी गटांनी आता शेतकररी उत्पादक कंपनीकडे वाटचाल करावी, असे आत्माचे डी.बी. काळे यांनी केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे कृषी संवादिनीचे वाटप करण्यात आले. गुुलाबी बोंडअळी नियंत्रण व्यवस्थापन व उपाययोजना, उन्हाळी भूईमूग, तीळ पीक व्यवस्थापन, पेरणी ते काढणीपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात आले. रामभाऊ मोर्शटवार, रवींद्र राऊत, रामेश्वर पवार, अमृत महिंद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार सागर बोंडे यांनी मानले.