लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : पीक विमा, कर्जमाफी, पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होता कामा नये. यासाठी सर्वच बँकांनी सजग राहिले पाहिजे. शासकीय मदतीची रक्कम कर्जात वळती न करता, थेट शेतकऱ्यांना देण्यात यावी, असे आमदार डॉ.अशोक उईके यांनी येथे सांगितले.येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी आमदार डॉ.अशोक उईके यांनी सर्व बँकेच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन स्थिती जाणून घेतली. विविध विभागाकडून वृक्ष लागवड योजनेचा आढावा घेण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, वनसंरक्षक प्रशांत पिंगळे, खरेदी विक्री संघाचे सभापती बालु पाटील दरणे, पंचायत समिती सदस्य स्वाती दरणे, उपनगराध्यक्ष मनोज काळे, प्रा.घनशाम दरणे, भाजपा तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, शहर अध्यक्ष रुपेश राऊत उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी तर, आभार तहसीलदार रणजित भोसले यांनी मानले.
शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 22:04 IST
पीक विमा, कर्जमाफी, पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होता कामा नये. यासाठी सर्वच बँकांनी सजग राहिले पाहिजे. शासकीय मदतीची रक्कम कर्जात वळती न करता, थेट शेतकऱ्यांना देण्यात यावी, असे आमदार डॉ.अशोक उईके यांनी येथे सांगितले.
शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये
ठळक मुद्देअशोक उईके : कळंब तहसील कार्यालयात आढावा बैठक