नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचे निवेदन
By Admin | Updated: March 23, 2015 00:06 IST2015-03-23T00:06:19+5:302015-03-23T00:06:19+5:30
अवकाळी पावसाचा फटका तालुक्यातील कोठा परिसराला बसला. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नष्ट झाली.

नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचे निवेदन
कळंब : अवकाळी पावसाचा फटका तालुक्यातील कोठा परिसराला बसला. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नष्ट झाली. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी तहसीलदार संतोष काकडे यांना निवेदन सादर केले आहे.
कोठा गावातील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. शेतातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. हातात येणारे पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतले. या घटनेची तहसीलदार संतोष काकडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. त्यांनी नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेशही दिलेले आहे. नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार संतोष काकडे यांना देण्यात आले.
निवेदनावर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष पवन कदम, शंकर शिंगोटे, प्रशांत निंबर्ते, दत्ता गोरे, नीलेश बहाड, संजय येसनसुरे, प्रमोद भोयर, प्रवीण शिंदे, राजेश उघडे, अमोल काळे, नारायण बुरबुरे, शैलेश निमकर, गोपाल गोरे, विलास परापटे, मनिष कदम, धनराज गुल्हाने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)