शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बाजार समितीत शेतकऱ्यांचा रुद्रावतार

By admin | Updated: April 24, 2017 00:01 IST

तूर खरेदीच्या अखेरच्या दिवशी नाफेडकडून व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला.

नाफेडची तूर खरेदी : कार्यालयात तोडफोड, खुर्च्यांची फेकाफेक, हमाल व मापाऱ्यांकडून मोजणी बंद यवतमाळ : तूर खरेदीच्या अखेरच्या दिवशी नाफेडकडून व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीत रुद्रावतार धारण करीत कार्यालयात तोडफोड केली. खुर्च्यांची फेकाफेक केली. या प्रकाराने प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने हमाल आणि व्यापाऱ्यांनी तुरीचे मोजमापच बंद केले. परिणामी शेकडो शेतकऱ्यांना रात्रभर बाजार समितीच्या आवारातच थांबावे लागले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी केली जात होती. परंतु सुरुवातीपासूनच या तूर खरेदीबाबत गोंधळाची स्थिती होती. २२ एप्रिलपासून खरेदी बंदचे आदेश धडकले. त्यामुळे टोकनधारक शेतकरी दोन दिवसांपासूनच येथे ठाण मांडून होते. शनिवारी पोलीस संरक्षणात खरेदी करावी लागली. तरीही संपूर्ण तूर खरेदी होऊ शकली नाही. शनिवारी सायंकाळी बाजार समितीत काही व्यापाऱ्यांच्याच तुरी खरेदी केल्या जात होत्या. परंतु गत काही दिवसांपासून मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना डावलले जात होते. ६०० ते ७०० टोकन नंबर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुरी मोजल्या जात नव्हत्या. १२००, १५००, १७०० टोकन क्रमांक असलेल्यांच्या तुरींची मोजणी होत होती. नाफेडचे कोणतेही नियोजन नसल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यातच दुपारपासून बारदान्याचा तुटवडा होता. रात्री १६ गाठी बारदाना पोहोचला. मात्र यातील बहुतांश बारदाना व्यापाऱ्यांच्या मजुरांनी पळवून नेला. त्यामुळे वातावरण आणखीणच तापले. रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास काही शेतकऱ्यांनी बाजार समिती सभापतीच्या कक्षाकडे धाव घेतली. तेथेही कुणीच नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काट्याची तोडफोड करीत संताप व्यक्त केला. त्यानंतर शेतकरी व्यापाऱ्यांच्या तुरी मोजणी सुरू असलेल्या ठिकाणाकडे वळले. हा गोंधळ पाहून हमाल व मापारीही चांगलेच संतापले. त्यांनी शेतकऱ्याच्या मालाला व्यापाऱ्यांचा माल म्हणून फेकाफेक का करता असे म्हणत तेथे उपस्थित संचालक व व्यापाऱ्याला जाब विचारला. संचालकाला धक्काबुक्की झाली तर उपस्थित व्यापाऱ्याला चांगलाच चोप देण्यात आला. या प्रकारामुळे हमाल व मापाऱ्यांनी तुरीचे मोजमाप थांबविले. तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात सभापती रवींद्र ढोक यांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली. (शहर वार्ताहर) नाफेडचा छापाच पळविलाकेंद्रावर आलेल्या बारदान्यावर नाफेडचा छापा मारणे महत्वाचे असते. रात्री येथे आलेल्या बारदान्यावर छापे मारले जात होते. या ठिकाणी दोन छापे होते. मात्र रात्री यातील एक छापा अचानक पळविला गेला. त्यामुळे ध्वनीक्षेपकावरून उद्घोषणा करण्यात आली. काही वेळानंतर हा छापा केंद्रात परत आला. लिलावगृहात पोते पोहोचले कसे ?लिलावगृह केवळ शेतमालाच्या लिलावासाठी आहे. खुल्या मैदानात नाफेडच्या तुरी आहे. शनिवारी रात्री लिलाव गृहाच्या मोठ्या शेडमध्ये तुरीचे मोजमाप करण्यात आले. हा शेतमाल व्यापाऱ्यांचाच असावा, असा संशय शेतकऱ्यांना आला. त्यामुळे त्यांनी मोजमाप थांबविण्याची मागणी केली. यानंतरही तुरीचा काटा करण्यात आला. या प्रकाराचाही शेतकऱ्यांनी संताप नोंदविला. २१ हजार शेतकरी टोकनधारक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाफेडला तूर विकण्यासाठी बाजार समितीतून टोकन घेतले. जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची संख्या २१ हजार आहे. या शेतकऱ्यांची पावणेचार लाख क्ंिवटल तूर अजूनही मोजण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यात यवतमाळ येथे ७ हजार ५०० क्ंिवटल, दिग्रस दहा हजार क्ंिवटल, उमरखेड दीड हजार क्ंिवटल, बाभूळगाव १२०० क्ंिवटल, पुसद १६ हजार ५७५ क्ंिवटल, कळंब २२०० क्ंिवटल, आर्णी दीडशे क्ंिवटल, पांढरकवडा पाच हजार क्ंिवटल, दारव्हा ११ हजार क्ंिवटल, मुकुटबन दीड हजार क्ंिवटल, मारेगाव ३५०० क्ंिवटल तुरीचा समावेश आहे.तूर खरेदीसाठी आजपासून घुगरी आंदोलनशेतकऱ्यांच्या तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र यवतमाळ जिल्ह्यात २१ हजार ३०० टोकनधारक शेतकऱ्यांची तीन लाख ७५ हजार क्ंिवटल तूर खरेदीच केली नाही. उलट नाफेडने २२ एप्रिलपासून खरेदी बंद केली. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जिल्हा शेतकरी संघर्ष समितीने सोमवारपासून घुगरी आंदोलन (तूर शिजवून वाटप करणे) करण्याची घोषणा येथे पत्रकार परिषदेत केली. जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे सभापती, संचालक, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष-संचालक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता यवतमाळ बाजार समितीतील संघर्ष समितीचा मोर्चा निघणार आहे. पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकाऱ्यांना तुरीच्या घुगऱ्या देऊन प्रतिकात्मक आंदोलन केले जाणार आहे. यानंतरही शासन मानले नाही तर तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन आणि त्यानंतर चक्काजाम करून जिल्हाबंदचा इशाराही देण्यात आला. पत्रपरिषदेला कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, मारेगावचे नरेंद्र ठाकरे, यवतमाळचे रवींद्र ढोक, दिग्रसचे साहेबराव चौधरी, नेरचे रवींद्र राऊत, उमरखेडचे कृष्णा देवसरकर, वणीचे संतोष कुचनकर, आर्णीचे राजेंद्र पाटील, बाबूपाटील दरणे, जितेंद्र कोंघारेकर, झरीचे पांडुरंग रोहे, देवानंद पवार, अशोक बोबडे, अरुण राऊत, अशोक भुतडा, अनिल गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित होते. आम्ही फक्त अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. टोकन देण्याचा अधिकार बाजार समितीला आहे. त्यांनी दिलेल्या टोकननुसार आम्ही मोजमाप केले. ते व्यापारी होते की शेतकरी हे सांगणे अवघड आहे. बाजार समितीने ते पाहणे गरजेचे आहे. शनिवारी गोंधळ उडाल्यावर आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. - अशोक गुल्हानेजिल्हा व्यवस्थापक, विदर्भ को.आॅप. मार्केटिंग फेडरेशन