शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:31 IST

शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी शासनाने शेती उत्पादीत प्रत्येक मालाचे हमी भाव जाहीर केले. हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापारी किंवा यंत्रणेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद पणन व विनियमन अधिनियमात केली आहे.

ठळक मुद्देहमीभाव फलकावरच : वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचीही चुप्पी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी शासनाने शेती उत्पादीत प्रत्येक मालाचे हमी भाव जाहीर केले. हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापारी किंवा यंत्रणेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद पणन व विनियमन अधिनियमात केली आहे. तरीही कायद्याला न जुमानता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून चना व तूर खरेदी करताना क्विंटलमागे एक हजार ते बाराशे रूपये कमी भाव देत आहे. शेतकऱ्यांची ही लूट बाजार समितीचे प्रशासन, पदाधिकारी, शासनाचे प्रतिनिधी उघड्या डोळ्यानी पाहत आहे. मात्र शेतकºयांचा कैवार घेण्याची कोणाचीही तयारी नाही.शासनाने कापूस, सोयाबीन, तूर, हरबरा या मालांचे हमी भाव जाहीर केले. मात्र शेतकºयांकडील सर्व माल खरेदी करण्यासाठी शासकीय यंत्रणा उभी करता आली नाही. नाफेडच्या सहकार्याने सोयाबीन, तूर व हरभरा खरेदी करण्यास सुरूवात केली. मात्र ही खरेदी अल्प काळासाठी सुरू ठेवण्यात आली. शेतकऱ्यांनी तूर, हरभरा विकण्यासाठी खरेदी-विक्री समितीकडे आॅनलाईन नोंदणी करून टोकण घेतले. शेतकऱ्यांकडे माल भरपूर होता. शासनाची खरेदी धिमीगतीने चालली. महिनाभर प्रतीक्षा करूनही शेतकरी आपला माल बाजार समितीच्या यार्डात आणत होते. मात्र शेतकऱ्यांकडील संपूर्ण तूर व हरभरा संपण्यापूर्वीच नाफेडने तूर व हरभराची खरेदी बंद केली. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना आपला माल व्यापाºयांना विकावा लागत आहे. अजूनही बाजार समितीमध्ये दररोज ३०० ते ४०० क्विंटल धान्य विक्रीसाठी येत आहे. व्यापाऱ्यांना हरभरा विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रूपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले. मात्र यामध्येही अनेक अटी टाकून शेतकऱ्यांना यातून बाद करण्याचा प्रयत्न होत आहे. अनुदानाचे धोरणही स्पष्ट झालेले दिसत नही. व्यापारी शेतकऱ्यांकडून तूर तीन हजार ५०० रूपये, तर हरभरा दोन हजार ७०० ते तीन हजार रूपये प्रति क्विंटल दराने खरेदी करीत आहे. शासनाने हमी भाव तूर पाच हजार ४५० व हरभरा चार हजार रूपये प्रतिक्विंटल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे क्विंटलमागे हजार-दीड हजार रूपयांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची ही लूट होत असताना बाजार समितीचे पदाधिकारी किंवा अधिकारी चुप कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.मालाच्या सुरक्षेची हमी बाजार समितीवरयेथील बाजार समितीमध्ये दररोज खरेदी केलेला माल व्यापारी उघड्या शेडमध्ये ठेवतो. त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांनी बाजार समितीवर ढकलली आहे. बाजार समिती प्रशासनही व्यापाऱ्यांपुढे नमते होऊन त्यांनी आपले वॉचमन व्यापाऱ्यांच्या मालाच्या सुरक्षेसाठी लावले आहे. यार्डात डुकरांचा सुळसुळाट आहे. त्यांना हाकता-हाकता वॉचमनच्या नाकिनऊ येत आहे. रात्रभर जागून पोत्यांची राखण करावी लागत आहे.शेतकऱ्यांची लेखी हमी घेऊन त्यांच्या संमतीने माल व्यापाऱ्यांना विकला जात आहे. ज्या शेतकऱ्यांना सध्याच्या दरात माल विकायचा नसेल, त्यांच्यासाठी बाजार समितीने तारण योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना ७५ टक्के कर्ज मिळते. भाव वाढल्यावर शेतकरी माल विकू शकतात.- संतोष कुचनकार, सभापती

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी