मुकुटबनमध्ये शेतकरी मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:38 IST2018-03-22T23:38:57+5:302018-03-22T23:38:57+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक रकमी कर्ज परतफेड योजनेबाबत शेतकरी सभासदांकरिता मेळावा घेण्यात आला.

मुकुटबनमध्ये शेतकरी मेळावा उत्साहात
ऑनलाईन लोकमत
मुकुटबन : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक रकमी कर्ज परतफेड योजनेबाबत शेतकरी सभासदांकरिता मेळावा घेण्यात आला.
मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अध्यक्ष आशा जुनघरी, नरेंद्र बोदकुरवार, मारोतराव पाचभाई, सभापती संदीप बुर्रेवार, गजानन मांडवकर, बापूराव जिन्नावार, आर.आर.सिंगुरवार उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ झाले आहे, परंतु त्यावरील उर्वरित रकमेचा भरणा केला नसेल, असे पात्र लाभार्थी शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेऊ शकतात, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. संचालन बंडू रासेकर यांनी केले, तर आभार एस.एन.पानघाटे यांनी मानले. रमेश मंदावार, किशोर काळे, प्रेम अग्रवाल, राजू मांडवकर, एन.बी.मुत्यलवार उपस्थित होते.