वीज कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक
By Admin | Updated: September 9, 2015 02:39 IST2015-09-09T02:39:08+5:302015-09-09T02:39:08+5:30
वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील आसेगाव देवी, पांढुर्णा, आसोली व पिंप्री या गावच्या असंख्य नागरिकांनी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली.

वीज कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक
बाभूळगाव : वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील आसेगाव देवी, पांढुर्णा, आसोली व पिंप्री या गावच्या असंख्य नागरिकांनी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली.
शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा दोन वर्षांपासून खंडीत रहात असून, शेतकऱ्यांना नाहक त्रास व नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असतानाही वीज मंडळाकडून वारंवार वीज खंडीत करण्यात येते. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर आदींचे उभे पीक सध्या वाळण्याच्या मार्गावर आहे. या गावांमध्ये आठवड्यातून केवळ तीन दिवस वीज पुरवठा करण्यात येतो. आणि त्याही तीन दिवसात दुरूस्तीचे काम काढले जाते. अशा वेळी अतिरिक्त दिवस दिले जात नाही. त्यामुळे दोन दिवसात सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा या सर्व गावातील शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी उद्धव खोडे, डॉ. सुभाष सुद्दलवार, गजानन कोळमकर, विवेक तडसकर, महेश पाटील, प्रदीप लुणावत, रवींद्र आंबिलकर, सुरेश आडे, संदीप लुणावत, पुरूषोत्तम गावंडे, राजीव बेले, दत्तात्रय आडे, दादाराव आडे आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)