शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब व वृद्धाश्रमाला मदत
By Admin | Updated: June 25, 2017 00:26 IST2017-06-25T00:26:34+5:302017-06-25T00:26:34+5:30
उमरी पठार येथील वृद्धाश्रम आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ५१ हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा रजनीकांत बोरले यांनी

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब व वृद्धाश्रमाला मदत
रजनीकांत बोरले : धनादेश केला सुपुर्द
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उमरी पठार येथील वृद्धाश्रम आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ५१ हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा रजनीकांत बोरले यांनी शनिवारी केली. पत्रकार परिषदेत संबंधितांकडे त्यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
कारंजा येथील सरला अजय महाजन यांच्यावतीने २५ हजार ५०० रूपयांचा धनादेश उमरी पठार वृद्धाश्रमाला देण्यात आला. तर दुसरा धनादेश रजनीकांत बोरले यांनी आपल्या निधीतून दिला आहे. २५ हजार ५०० रूपयांचा धनादेश क्रांतीज्योती महिला बहुउद्देशीय ग्रामीण प्रशिक्षण केंद्राला देण्यात आला. हे प्रशिक्षण केंद्र शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी काम करीत आहे.
हा धनादेश डॉ. प्रकाश नंदुरकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी रजनीकांत बोरले, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या सुनंदा गवळी, कांचन प्रदीप कांबळे, सरला अजय महाजन, पुनम महाजन, भूमिका राय, शेषराव डोंगरे उपस्थित होते.