शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शेतकऱ्याने मजुरांना मोफत वाटले १५ क्विंटल गहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. त्यांच्यावर उपासमार ओढावली आहे. या मजुरांना दोन ...

ठळक मुद्देदारव्हा तालुक्यातील शेतकºयाची अशीही दिलेरी : संचारबंदीत दिलासा, चाणी कामठवाड्यातील शेतात गर्दी

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. त्यांच्यावर उपासमार ओढावली आहे. या मजुरांना दोन घास अन्न मिळावे म्हणून दारव्हा तालुक्यातील चाणी येथील शेतकरी श्रावण राठोड यांनी आपल्या शेतात काढणी झालेला गहू मजुरांना वाटून दिला. ४५० ते ५०० गरजवंतांना १५ क्विंटल गव्हाचे वाटप करण्यात आले.लॉकडाऊनचा फटका गावापासून शहरापर्यंत सर्वांनाच बसला आहे. रोजमजुरीसाठी शहराकडे धाव घेणारे शेतमजूर आता घरी बसले आहे. दोन वेळचे अन्न कसे मिळावे, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. ही स्थिती पाहता श्रावण राठोड यांनी मजुरांना गहू देण्याचा निर्णय घेतला. शेतात काढणी झालेला गहू प्रशासनाच्या उपस्थितीत वाटण्यात आला.श्रावण राठोड यांनी सव्वा दोन एकरात गव्हाची लागवड केली. त्यांना २० ते २५ क्विंटल गहू झाला. त्यांनी प्रत्येक गरजवंताला पाच किलो याप्रमाणे ४५० व्यक्तींना गव्हाचे वितरण केले. मंगळवारी सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत या गव्हाचे वितरण करण्यात आले. शेतातील अन्न गरजवंताच्या कामी आले याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. याच पद्धतीने प्रत्येकाने मदत करावी, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.यावेळी राठोड यांच्या शेतात सर्व गरजवंतांनी ‘सोशल डिस्टन्स’ ठेवत हा गहू मिळविला. प्रत्येक जण रूमाल, मास्क बांधून ठराविक अंतरावर उभे होते. यावेळी कृषी सहाय्यक पी.एस. बोइनवाड, तालुका कृषी अधिकारी थोरात, मंडळ अधिकारी दीपक मडावी, तलाठी स्वाती गजभिये, सरपंच विद्या नामदेव ठोकळ, उपसरपंच सुरेश शाहू, पोलीस पाटील वृंदा मडावी, विनोद पजगाडे, मयूर घोडाम, विलास राठोड उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsocial workerसमाजसेवक