नेर येथे शेतकरी निर्धार परिषद
By Admin | Updated: November 7, 2015 02:37 IST2015-11-07T02:37:49+5:302015-11-07T02:37:49+5:30
शेतकऱ्यांच्या हुंदक्यांचे रुपांतरण हुंकारात करण्यासाठी नेर येथे शेतकरी निर्धार परिषदेचे आयोजन ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्वागत मंगलकार्यालयात करण्यात आले आहे.

नेर येथे शेतकरी निर्धार परिषद
परिवसंवादाचे आयोजन : युवा शेतकरी संघर्ष समितीचे आयोजन
नेर : शेतकऱ्यांच्या हुंदक्यांचे रुपांतरण हुंकारात करण्यासाठी नेर येथे शेतकरी निर्धार परिषदेचे आयोजन ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्वागत मंगलकार्यालयात करण्यात आले आहे. युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आयोजीत या परिषदेचे उद्घाटन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत
तुपकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
एका दाण्याचे एक हजार दाणे करणारा शेतकरी मरणाच्या दुष्टचक्रात ढकलला जात आहे. सोयाबीनने दगा दिला. कुणीही यावे आणि शेतकऱ्याला लुटावे अशी स्थिती आहे. त्यातच वन्यप्राणी वीज वितरण कंपनी, प्रशासकीय यंत्रणा आणि शासन निगरगट्ट झाले आहे.
अशा दयनीय अवस्थेतून शेतकऱ्यांना बाहेर कााढण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी वऱ्हाडी कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून नेर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पवन जयस्वाल, सहकार नेते बाबू पाटील जैत, नेर अर्बनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र गद्रे, पंचायत समिती सभापती भारत मसराम उपस्थित राहतील.
यावेळी शेतकऱ्यांच्या मरणाची कोंडी कशी फुटणार या विषयावर परिसंवाद आयोजित आहे. अध्यक्षस्थानी शेती प्रश्नांचे अभ्यासक चंद्रकांत वानखडे राहतील. या परिसंवादात सामाजिक प्रश्नांचे तत्वचिंतक अमर हबीब, शेतकरी आंदोलक विजय जावंधिया, विजय विल्हेकर, गजानन अमदाबादकर मार्गदर्शन करणार आहे.
समारोपीय कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता आयोजित असून, अध्यक्षस्थानी प्रहार युवाशक्ती संघटनेचे नेते तथा अचलपूरचे आमदार ओमप्रकाश-बच्चू कडू राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र माहुरे, भाजपा तालुकाध्यक्ष पुरूषोत्तम लाहोटी, शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन भोकरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अॅड़ दिलीप देशमुख, कृषिभूषण हिंमतराव देशमुख उपस्थित राहणार आहे. या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)