पुसद येथे शेतकरी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:44 IST2021-08-23T04:44:27+5:302021-08-23T04:44:27+5:30
पुसद : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात शेतकरी दिन साजरा करण्यात आला. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन ...

पुसद येथे शेतकरी दिन साजरा
पुसद : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात शेतकरी दिन साजरा करण्यात आला.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी, हाताळणी व वापर या विषयावरील कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. पंचायत समिती सभापती छाया अर्जुन हगवणे अध्यक्षस्थानी होत्या. उपविभागीय अधिकारी सावन कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी सुरक्षित फवारणीबाबत माहिती दिली. कविष गावंडे, भाऊ जाधव, अनिल परळीकर, कृषी पर्यवेक्षक व्ही. बी. राठोड यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मंडळ कृषी अधिकारी एन. एस. राठोड, बी. डी. चेके यांनी विविध योजनांची माहिती दिली. यावेळी तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा वृक्ष व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन मंडळ कृषी अधिकारी एन.एस. राठोड, तर आभार कृषी पर्यवेक्षक एन.बी. नरवाडे यांनी मानले. आत्माचे बीटीएम एस.डी. मोरे, अर्जुन हगवणे, कृषी अधिकारी शंकर राठोड, अश्विनी थोरात, बी.एम. मस्के, एस.बी. सूर्य, अंजुम शेख, डी.बी. पुंडे, जे.आर. रोहने, ए.आर. करे यांच्यासह कृषिमित्र व शेतकरी उपस्थित होते.