शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 6:00 AM

सध्या तालुक्यात तूर काढणीला वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सवंगणीनंतर तूर काढणी सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून येथील बाजार समितीत तुरीची आवक प्रचंड वाढली आहे. दररोज बैलबंडीसह वाहनांमध्ये तूर आणली जात आहे. यवतमाळनंतर येथील बाजार समिती सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते. मात्र शेतकऱ्यांना येथे शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असूनही रस्त्यावर शेतमाल ठेवण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपुसद बाजार समिती : व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये, कास्तकार मोजणीच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून तुरीची आवक वाढली आहे. मात्र शेतकºयांना तूर ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्यांचा शेतमाल उघड्यावर आहे. त्याचवेळी व्यापाºयांचा शेतमाल मात्र बाजार समितीच्या शेडमध्ये असल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.सध्या तालुक्यात तूर काढणीला वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सवंगणीनंतर तूर काढणी सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून येथील बाजार समितीत तुरीची आवक प्रचंड वाढली आहे. दररोज बैलबंडीसह वाहनांमध्ये तूर आणली जात आहे. यवतमाळनंतर येथील बाजार समिती सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते. मात्र शेतकऱ्यांना येथे शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असूनही रस्त्यावर शेतमाल ठेवण्याची वेळ आली आहे. बाजार समितीच्या व्यापारीधार्जीन्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.यंदा तुरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात झाले आहे. दररोज एक हजार ते दीड हजार पोते विक्रीस येत आहे. मात्र शेडमध्ये व्यापाºयांची तूर असल्याने शेतकऱ्यांना आपली पोते रस्त्यावरच ठेवावी लागत आहे. शेतमालाच्या राखणीसाठी त्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. बाजार समितीच्या नियमानुसार सात दिवसांच्या आत या शेडमधील शेतमाल उचलणे बंधनकरक आहे. मात्र व्यापाऱ्यांना झुकते माप देत बाजार समिती त्यांच्या शेतमालाची उचल करीत नाही.बाजार समितीचे संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने व्यापारी निर्धास्त आहे. शेतकºयांना मात्र आपला शेतमाल उन्हातान्हात रस्त्यावर ठेवून त्याची राखण करावी लागत आहे. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यामधील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बाजार समितीत अनेक दिवस मुक्काम करावा लागत असल्यानेही शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे.व्यापाऱ्यांना नोटीस देऊन चार ते पाच दिवसात शेड रिकामे करण्यास सांगितले जाईल. तुरीची आवक वाढल्याने हा प्रसंग उद्भवला आहे.- कौसरभाईसभापती, बाजार समिती, पुसद

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड