कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची कचेरीवर धडक
By Admin | Updated: January 5, 2017 00:11 IST2017-01-05T00:11:11+5:302017-01-05T00:11:11+5:30
कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बळीराजा पार्टीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा क चेरीवर धडक दिली.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची कचेरीवर धडक
महिलांचा लक्षणीय सहभाग : बळीराजा पार्टीचे प्रशासनाला निवेदन सादर
यवतमाळ : कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बळीराजा पार्टीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा क चेरीवर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारकडून होणाऱ्या गळचेपीचा निषेध नोंदविला. फलक उंचावून मागण्यांकडे लक्ष वेधले.
येथील पोस्टल ग्राउंडवरून निघालेला मोर्चा विविध मार्गाने मार्गक्रमण करीत जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी मोर्चेक ऱ्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी रेटून धरली. कापूस, सोयाबीन पिकांना खर्चावर आधारित भाव देण्यात यावा, शेतातील मोटारपंपाचे वीज बिल माफ करावे, नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या व्यवहाराकरिता पर्यायी मार्ग त्वरित काढण्यात यावा, भूमी अधिग्रहण न करता जमीन भाडेतत्वावर देण्यात यावी, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, शेतकरी, शेतमजुर, बेरोजगार आणि महिलांना स्कॉलरशीपप्रमाणे व्होटरशीप लागू करावी, बचतगटांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपनीवर कारवाई करावी, वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. विदर्भ मुख्य महासचिव विठ्ठलराव दर्वे, जिल्हाध्यक्ष राजन भुरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी अंकुश विरुटकर, संदीप भगत, देवरावजी मासाळ, विलास महल्ले, शिवाजी तिरमारे, सिध्दार्थ गायकवाड, ज्ञानेश्वर आसुटकर, विजय डबुरकर, गजानन फाळे, समिर गावंडे, रमेश वरठी, रूपेश शिदोडकर, अश्वजित शेळके उपस्थित होते. (शहर वार्ताहर)