उमरखेड येथे शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा

By Admin | Updated: August 7, 2014 00:03 IST2014-08-07T00:03:52+5:302014-08-07T00:03:52+5:30

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन उमरखेड महागाव तालुक्यातील शेकडो शेतकरी येथील उपविभागीय कार्यालयावर भाजपाच्या नेतृत्वात धडकले.

Farmers' Baldandi Morcha at Umarkhed | उमरखेड येथे शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा

उमरखेड येथे शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा

उमरखेड (कुपटी) : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन उमरखेड महागाव तालुक्यातील शेकडो शेतकरी येथील उपविभागीय कार्यालयावर भाजपाच्या नेतृत्वात धडकले.
पीक विम्याचे पैसे तत्काळ द्यावे, सिंचन विहिरींचे देयके अदा करावी, उसाला प्रति टन चार हजार रुपये भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षण फी माफ करावी, चारा छावण्या सुरू कराव्या या व इतर मागण्यांसाठी भाजपाचे नेते पाशा पटेल यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील सहभागी बैलबंड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
मोर्चात तालुक्यातील शेकडो महिला व पुुरुष सहभागी झाले होते. उपविभागीय कार्यालयावर पाशा पटेल, माजी आमदार मदन येरावार, राजू नजरधने यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांना एक निवेदन देण्यात आले.
या वेळी व्यंकटेश लोणे, आदेश जैन, भाजूसिंग चव्हाण, नितीन भुतडा, सुनील गाजेगावकर, विजय गुजरे, नामदेव ससाणे, गजानन मोहळे, फिरोज पठाण, बबलू मैंद, उज्वला भारती, मनीषा काळेश्वरकर, रजनी मुडे, मनीषा ओझलवार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Farmers' Baldandi Morcha at Umarkhed